तडका - भेटी गाठी

Started by vishal maske, June 02, 2021, 09:59:36 PM

Previous topic - Next topic

vishal maske

भेटी गाठी

हल्ली कोण कुणाला भेटेल
अंदाज लावणे चुकीचे आहे
कुणाचे भेटणे षढयंत्री तर
कुणाचे भेटणे एकीचे आहे

मात्र त्यांच्या भेटी-गाठीच्या
चर्चेचा मिडीयात पाऊस आहे
अन् इतक्या भेटी होऊन देखील
ज्वलंत विषयांस कंस आहे ?

जशा भेटी घडवल्या जातात
तशा समस्याही सोडवाव्यात
जनतेच्या समस्या सोडवण्या
भेटीही नक्कीच वाढवाव्यात

ॲड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड
मो. ९७३०५७३७८३


https://youtu.be/6OwyKSt2iOg

Atul Kaviraje

     विशाल सर, म्हणतात ना, कोर्टाची पायरी कुणी चढू नये, आणि राज-कारणात कुणी पडू नये.
अगदी तंतोतंत खरे आहे. आजच्या राज-कारणात काय शिजत आहे, हे रोजच्या बातम्यात आपणांस आवर्जून दिसतं. मोठ्या मोठ्या नेत्यांच्या ज्या राजकीय भेटी गाठी होतात, त्यात कुठल्या समस्यांवर , प्रश्नांवर  बोलणी होते,  आणि त्यातून काय निष्कर्ष निघतो, हे सूज्ञांस सांगणे नलगे. याच गोष्टी आपण आपल्या "भेटी गाठी", या कवितेतून दर्शवून आजच्या राज-कारणावर प्रकाश-झोत टाकला आहे.

     कवितेतून आपण सांगितल्याप्रमाणे, या नेत्यांच्या भेटी गाठी, जनतेसाठी असतील, त्यांच्या ज्वलंत समस्यांसाठी असतील, आणि त्यातून जनतेच्या हितासाठी काही फायदेशीर गोष्टी निघत असतील, तर ते स्वागतार्ह असेल. नेत्यांनी असे काम करावे, कि जनता त्यांची वाहवा करेल, कायमची पाठ-राखण करेल, असं मला वाटतं. आणि मग तो खऱ्या अर्थाने जनतेला पुढे नेणारा असेल, नेता असेल.

     विशाल सर, अश्या चारोळ्या, कविता, वात्रटिकांतून समाज प्रबोधन करीत राहा, समाजोपयोगी  कार्य करीत राहा, त्यातून समाजाचे हितच साधेल, धन्यवाद.

     जनतेच्या सेवेस सर्वांगीण अर्पण
     नेता करून आपुले जीवन
     ठरवून  करितो कर्म निस्वार्थ
     तेव्हाच होतंय  जीवन सार्थ.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-०२.०६.२०२१-बुधवार.

vishal maske