चारोळी -लेख - "पावसाचे पडणे"

Started by Atul Kaviraje, June 06, 2021, 02:04:05 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                चारोळी -लेख
                               "पावसाचे पडणे"
                               --------------

नाही दश-दिशांचे बंधन
असो, अंबर-क्षितिजाचे मिलन
येई गरजत, अविरत बरसत,
करीत साऱ्या सीमेचे उल्लंघन.
=================


     मित्रानो, तर असा हा पाउस, त्यांचे गुण गान करावे तेवढे थोडेच, त्याच्या येण्याला, पडण्याला उपमाच नाही, अविरत , सतत, निरंतर पडताना पाहून तर माझे कधी कधी शब्दच थकतात, त्याच्याकडे नुसतेच पहावेसे वाटते, त्याच्यात मिसळावेसे वाटते, त्याच्यात एक रूप व्हावेसे वाटते आणि एक अनोख्या जगात  त्याच्यासवे जावेसे वाटते. जेथे फक्त तो आणी मीच असेन, त्याच्यासोबत रमावेसे वाटते, त्याच्या कुशीत शांतपणे सर्व सर्व काही विसरून निजावेसे वाटते, काळ तिथेच थांबावासा वाटतो, एक दिव्यत्त्वाची प्रचीती या पावसाकडे पाहून मला नेहमीच येते.


सदैव  प्रचीत येत अद्भुत
दिव्यत्त्वाची अनुभूती येत नित
शांत, शीतल, प्रेमळ, रूप त्याचे
घर करून बसलेय मम मनात.


     तर अश्या या पावसाला, निसर्गाच्या या पुत्राला, ईश्वराच्या या देवदूताला पडताना, येण्याला कोणी म्हणजे अगदी कोणीही परावृत्त करू शकत नाही, कोणामध्ये इतकी ताकद नाही कि त्याला क्षणिक थांबवावे, त्याला आडकाठी करावी, त्याला बंधने घालावीत, पण असे कधीही आजवर घडले नाही, आणि पुढेही ते घडणार नाही, तो मुक्त आहे, तो स्वच्छंदी आहे, तो कुणाच्याही बंधनात नाही, त्याला दश-दिशांचे हि बंधन नाही, तो येतो, साऱ्या बाजूनी येतो , त्याला ठाव नाही त्याला अंत नाही त्याला मर्यादा नाहीत, त्याच्या पडण्याला सीमा नाही, सगळीकडून तो येतो अगदी सर्व चराचर कवेत घेऊन बरसतो, त्याला अंबर माहित नाही, त्याला क्षितीज माहित नाही, त्याला फक्त पडणे , बरसणे माहित आहे , कळी काळाचेही त्याला बंधन नाही, असा तो गरजत येतो, गरजत बरसतो, त्याला रोकणे हे कोणाच्याही हाती नाही, तो मुक्त आहे, मोकळा आहे, निर्बंध आहे,स्वैर आहे,  मनस्वी आहे, मनाप्रमाणेच येतो, बरसतो.


त्याचे मन  कुणी जाणिले
त्याचा ठाव कुणी पहिला
ना उगम ना अंत तयाला
असा तो एकच एकला.


     तर मित्रानो असा हा पाउस मन मानेल तसा पडणारा, सर्व सीमांचे उल्लंघन करीत येणारा, दश-दिशांचे बंधन मोडून काढणारा, रोरावत येणारा, मुसळधार पडणारा, आकाश क्षितीज एक करणारा, एक दैवी अनुभव देणारा, धुक्यात वेढलेला, वाऱ्यासवे  येणारा, सर्व चरा चरास आपल्या चिंब शेकडो हातानी मिठीत घेणारा, सर्व व्यापक असा, सर्व सृष्टीस शीतलता प्रदान करणारा, शांती देणारा, सर्वांचा जीवन-दाता, सर्वाना आपले अमृत-थेंब समांतर वाटणारा, जीवन देणारा, त्याचे हे अनोखे रूप कधी कधी मनात एक भय निर्माण करून जाते, आदर युक्त भीती निर्माण करून जाते, अश्या या त्याच्या दैवी रुपास मी सदैव पहातो , त्याला मनात स्थान करून देतो , त्याला स-श्रध्द नमन करतो .


तो एक आपलासा वाटतो
तो नेहमीच जवळचा असतो
भरकटलेल्या मनाला त्याच्या मात्र स्पर्शाने
एक सुखद दिलासा मिळतो.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.06.2021-रविवार.