चारोळया पावसाच्या-भाग-४

Started by Atul Kaviraje, June 08, 2021, 11:38:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                     चारोळया पावसाच्या-भाग-४
                    -------------------------

1) कृष्ण-धवल पाउस

पहाता पहाता पांढरा रंग
काळ्या मध्ये विलीन झाला
रंगांच्या  रंगांमध्ये आम्हा रंगवून,
आला पाउस, पाउस आला.

2) पानगळी व पाउस

मी येणार, झाडांना बहरवणार
पाना- पानावर चैतन्य पसरवणार
पानगळीचे  मला ठावूक नाही,
माझे कार्य मी चोख करणार.

3) जंगल व पाउस

घनदाट जंगल, निबिड अरण्ये
सूर्य-किरणेही तिथे परततात माघारी
प्रत्येक थेंबाचे स्वागत असते इथे,
सकाळी, संध्याकाळी, रात्री, दुपारी.

4) पाउस व पायवाट

हि वाट अशीच दूरवर
कुणीही नाही पहिली आजवर
पाउस येतो, पाउस पडतो,
पाऊसच देतो तिला प्रेम-गहिवर.

5) ऋणानुबंध पावसाचे

आपल्यांचे, जगाचे सारे-सारे नाते
चल सखे, विसरुनी तिथे
फक्त तू,मी अन शाश्वत पाउस,
दृढ ऋणानुबंध असतील तिथे. 

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.06.2021-मंगळवार.