समाज - सत्य वास्तव कविता - " हाच का बुवांचा परमार्थ ?"

Started by Atul Kaviraje, June 10, 2021, 02:38:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र,मैत्रिणींनो,

     सोशल मीडिया वर काही दिवसांपूर्वी, पंचाऐशी वर्षांचे एक बुवा, आपल्या ऐंशी वर्षे वयाच्या पत्नीस, बादलीने मारीत होते, असे एक दृश्य दाखविले गेले होते. का तर त्यांची  पत्नी घरातले  काम करीत नव्हती. आता सांगा, हे तिचे काम करण्याचे वय आहे का ? हे दृश्य त्यांच्या, नऊ वर्षांच्या नातवाने मोबाईल वर टिपून ते व्हायरल केले होते.
संतापाची लाट सर्वत्र पसरली होती. नंतर त्या बुवांस पोलिसांनी अटक केली हे सांगावयास नको.

     मित्रानो, आजही हे गृह-कलह, अंतर्गत वाद, कमजोर व्यक्तींवर हात उचलणे, कर्त्या व्यक्तींचा घरी वरचष्मा असणे, सर्व घरावर एक नकोशी सत्ता गाजविणे, हे समाजात होतच असतात, पण त्याला न भिता, निडरपणे पुढे येऊन या समाज विघातक प्रवुत्तीना आळा घालणे, हे समाजातील लोकांच्याच हाती असते.

     ऐकुया, तर या वरील कथित आजच्या बुवांवर ( येथे बुवा-बाजी म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल ) एक समाज-प्रबोधनपर कविता - कवितेचे शीर्षक आहे- "हाच का बुवांचा परमार्थ ?"

                         " हाच का बुवांचा परमार्थ ?"
                         ------------------------

देवाचिये द्वारी कीर्तन करी
ईश्वराचे नाम मुखी धरी
रूप पालटी गेल्यावर घरी,
वृद्ध पत्नीस मार-हाण करी.

     बुवा म्हणवून घेई स्वतःस
     लोभसवाण्या वाणीने, फसवी जनतेस
     क्रूर राक्षस दडलेला अंतरी,
     मुखवटा सौजन्याचा वर धारण करी.

हरी हरी सदैव नाम मुखी
दाखवी देव-भक्तीत होऊन तल्लीन
एकदा का गाठली घराची खोली,
मुखातून वाहे शिव्यांची लाखोली.

     बाहेर एक, घरी एक
     रूपे अनंत या बुवांची
     सहज, रसाळ, अमोघ शब्दाने,
     लुबाडती जनतेस, फसव्या व्यक्तिमत्त्वाने.

ईश-भक्तीने मिळे काम -क्रोधावर संयम
इंद्रियांना जिंकून, फळे यम-नियम
बुवांची बुवा-बाजी इथेच दिसते,
षड रिपूंची, पळापळ होते.

     असे अनेक आहेत ढोंगी
     त्यांची उखडून टाकावी नांगी
     दंश करण्याचेही नाव नाही घेणार,
     हातात टाळ कधीच नाही घेणार.

पर्दाफाश करून अश्या बुवांचा
योग्य ते शासन व्हावे
कडक सजा त्यांना देऊन,
त्यांना कु-कर्माचे फळ मिळावे.

     आता समाजानेही व्हावे सतर्क
     फसू नये या ढोंग - बाजीला
     प्रबोधन व्हावे अशिक्षित लोकांचे,
     कर्तव्यच आहे समाज-भावी सेवकांचे.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-१०.०६.२०२१-गुरुवार.