राज-कारण वास्तव-वादी कविता - " किचन कॅबिनेटची भांडी उथळ का ?"

Started by Atul Kaviraje, June 10, 2021, 03:27:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

   
मित्र/मैत्रिणींनो,
     
     फार फार वर्षांपूर्वी, म्हणजे देशाच्या प्रधान-मंत्री, श्रीमती इंदिरा गांधी, हयात असतानाची राज-कारणातील कथा. त्यांच्या कॅबिनेट मधील मंत्र्यांचा विस्तार हा अमर्यादित होता. साऱ्या प्रामाणिक अश्या मंत्र्यानी भरलेली त्यांची कॅबिनेट हि अतिशय भक्कम होती. उथळ स्वरूपाची नव्हती, तर ती एकसंध होती. त्यांच्यात अतूट अशी एकी होती, फारकत नव्हती. सांगायचा मुद्दा म्हणजे, आपल्याघरी जसे भांडी ठेवण्यासाठी किचन कॅबिनेट बनवून घेतो, तद्वत इंदिरा गांधींच्या या मंत्री-मंडळास "किचन कॅबिनेट" असे नाव तेव्हा प्रचलित झाले होते.

     आता राज-कारणात अशी परिस्थिती आहे कि, हे किचन कॅबिनेट कुठेच आढळून येत नाही. मंत्र्याची एकी दिसून येत नाही. वाद-विवाद स्पर्धाच जास्त रंग आणते, एकमेकांना समजून घेण्याचे दूरच,तर चिखल-फेक ही होताना दिसून येते. या सरकारच्या  कथा  -कथित किचन कॅबिनेट मधील भांडी ही भक्कम नसून, ती केवळ उथळ , वाजणारी, आवाज करणारीच आहेत हे स्पष्ट दिसून येते. वर नमूद केल्याप्रमाणे या भांड्यांत भक्कम पणा हा राहिलेला नाही. ती फक्त वाजत आहेत, व यापुढेही वाजत राहातील हे सद्याच्या राज-कारणाच्या चित्रातून दिसत आहे.

     तर या तकलादू, सतत आवाज करणाऱ्या, कल्हई न केलेल्या. आताच्या सरकारच्या किचन कॅबिनेटच्या भांड्यांवर ,प्रकाश-झोत टाकण्यासाठी एक कविता रचली आहे.  श्री भाऊ तोरसेकर, या सुप्रसिद्ध अनालायझर, यांच्या "प्रतिपक्ष", या ब्लॉग  मधून यु-ट्यूब द्वारे माझ्या  वाचनात आली. संकल्पना आवडली, आणि तिचे स्वरूप कवितेने घेतले, आशा आहे, ही राज-कारणावरील खुमासदार कविता आपणास आवडेल, ऐकुया तर तर ही विनोदाची छोटीशी झाक असलेली कविता. कवितेचे शीर्षक आहे - "किचन कॅबिनेटची भांडी उथळ का?"

                              राज-कारण वास्तव-वादी कविता 
                         
                          " किचन कॅबिनेटची भांडी उथळ का ?"
                          ----------------------------------


होता अर्थ तेव्हा राज-कारणाला
दिसत होते खरे कार्य - कारण
समाजसेवेस वाहिलेले, हित पाहिलेले
अगदी खरे-खुरे मुत्सद्दी राज-कारणी.

     एकी होती, एकसंध मंत्री-मंडळांची
     दुजोरा होत, तफावत नव्हती तयांची
     भक्कम भांडी, सरकारच्या किचन कॅबिनेटची,   
     पडली तरी काय बिशाद, आवाजाची.

वर्षे उलटली, कितीतरी काळ लोटला
नव्या मंत्र्यांचा ताफा राज-कारणात आला
किचन कॅबिनेट नव्याने सजले,
भरपूर भांडयांनी, पुरेपूर भरले.

     पण या भांड्यात जोर नव्हता
     तेव्हाचा तो भक्कमपणा नव्हता
     सारीच भांडी उथळ होती,
     पडल्यावर आवाज करीत होती.

एकसुरी, एक-आवाज त्यात नव्हता
एक-संघ, एक-वाक्यतेचा अभावच होता
त्याची निघून जात कल्हई,
उघड पडत होते पितळ सारे.

     भांडी सारी आपटून एकमेकांवर
     भयाण आवाज होत होता
     वाद-विवादाचे स्वरूप घेत भांडण
     मूळ मुद्दा बाजूस राहात होता.

कॅबिनेटचा सारा नवेपणा, खरेपणा
जनता आता ओळखून होती
ही भांडी आता नाहीत कामाची,
स्वतःच निर्णय घेत होती.

     जोवर नाही एकी, नाही सुसूत्रता
     राज-कारणात फूट पडत राहील
     जोवर कॅबिनेट नाही भक्कम,
     तोवर भांडी आवाजच करत राहतील.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-१०.०६.२०२१-गुरुवार.