चारोळी-लेख - "अहं - भाव"

Started by Atul Kaviraje, June 13, 2021, 01:11:35 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                          चारोळी-लेख - "अहं - भाव"
                          ------------------------


पळता-पळता पुढे पळता
पहिला आलाय तोच जिंकलाय
पण धाव-पळीच्या या जीवना-मध्ये,
आमचा अहं-भाव तिकडेच थांबलाय.
===================

मित्र/मैत्रिणींनो,

     एका वेगळ्या विषयावरील चारोळी व त्यावरील निरुपण.

     माणसाच्या स्वभाव पैलूंपैकी एक उगाचच बाळगलेला स्वभाव म्हणजे, त्याचा मी-पणा, त्याचा अहं-पणा. माझंच खर, मी म्हणेन तीच पूर्व दिशा, सर्व गोष्टींमध्ये मीच, सर्वांनी माझंच ऐका, माझ्याकडे पहा, थोडक्यात जिथे मी आला तिथे मी-पणा आला, व जिथे मी-पणा आला तिथे अहंभाव आलाच.

     तर हा गर्व माणसाला वरून खाली कधी ढकलेल हे काही सांगता येत नाही. गर्वाचे घर खाली असे कुणीतरी म्हटलेच आहे, गर्व तो करतो, ज्याच्यात अहंपणा जास्त असतो, तो गर्व फुका असतो.

     खर आहे, या धका -धकीच्या जीवनात जो तो पळतोय, पुढे पुढे धावतोय. काहीतरी मिळविण्यासाठी, काहीतरी प्राप्त करण्यासाठी. चांगले आहे, प्रत्येकानेच पुढे जावे, चांगले जीवन जगावे, चांगले दिवस पाहावेत. एक अहमहमिका एक स्पर्धा जणू सर्वांमध्ये दिसून येत आहे. जो पहिला आला तोच जिंकला.या धर्तीवर जो तो पळताना  दिसतो, काहीतरी मिळवताना दिसतो.

     पण मला इथे एक गोष्ट जाणवली, स्पष्ट दिसून आली कि जरी तो हि धावपळ करून  पुढे गेला, जिंकला, त्याने स्वतःला बदलले, स्वतःला मोठ्या पदावर नेऊन ठेवले, त्याचे सर्व स्वभाव जरी बदलले तरी फक्त एकच स्वभाव तो कधीही बदलू शकत नाही, तो म्हणजे मी - पणा, अहं -पणा. मी म्हणजे काय, मी म्हणजे कोण, मी असा तसा नाही. यातून प्रौढी येते, गर्व येतो, शेखी येते.

     तर कुठेतरी आपल्यातला हा अहं - रुपी असुर, दानव, राक्षस याचा नाश व्हायला हवा, असे मला मनापासून वाटते. कदाचित आपल्यात हा मी - पणा जर नसेल तर आपली यापेक्षा अधिकच प्रगती होईल असेही मला वाटते. आपल्यात असलेल्या या असुरामुळे आपल्याला समोरचा मनुष्य हा तुच्छ वाटू लागतो. तो माझ्यापुढे काहीच नाही, मीच श्रेष्ठ ,सर्व-श्रेष्ठ ,असे जाणवू लागते. आणि शेवटी व्हायचे तेच होते. केव्हातरी मग अशी स्थिती येते कि हा सारा अहंभाव पायदळी तुडवला जातो. त्याला मग कोणीही विचारत नाही, आपल्याच मग्रुरी मध्ये तो सपशेल आडवा पडतो, तोंडघशी आपटतो. हे सर्व जेव्हा त्याला जाणवते, तेव्हा त्याचा अहंपणा कुठच्या कुठे पळून जातो ,नाहीसा होतो,आणी तो चक्क जमिनीवर येतो, माणसांत येतो.

     तर मित्रानो, या राक्षस-रुपी अहं-पणाला आज-पासून खत-पाणी घालायचे आपण सर्वांनी बंद करूया, व तो शब्द आपल्या शब्द-कोशांतून कायमचाच काढून टाकूया, व एक माणूस म्हणून जगूया.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.06.2021-रविवार.