पावसातील प्रेम कविता-" माझा राजकुमार मला मिळाला"

Started by Atul Kaviraje, June 14, 2021, 07:24:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र /मैत्रिणींनो ,

     पावसातील एक प्रेम - कविता सादर करतो. एका नवं-युवतीचे हे प्रेम-स्वगत आहे. तिला तो तरुण खूप आवडायचा. पण त्याच्यावरचे प्रेम जाहीर करण्यास तिला खूप संकोच वाटत राही. पण शेवटी पावसाने हे तिच्या मनीचे गुपित ओळखले, म्हणतात ना पावसापासून काहीही लपून राहत नाही. एके दिवशी, खूप पाऊस सुरु असतात, तिच्या मनीचा तो राजकुमार छत्री घेऊन उभा असल्याचे तिच्या लक्षात आले. भिजत भिजत ती आडोश्याचा  निमित्ताने हळूच त्याच्या छत्रीत शिरली, त्यानेही तिला नकार न देता छत्रीमध्ये आश्रय दिला.

     आणि इथेच तिच्या प्रेमाचे पहिले पाऊल पडले. प्रेमाची पहिली ठिणगी पडली. पहाता - पहाता आपल्या लाघवी बोलाने तिने त्याचे मन जिंकले आणि हे प्रेमाचे दुसरे पाऊल होते. आणि नंतर याची परिणती कश्यात झाली, हे आपणासारख्या सुज्ञ मित्र/मैत्रीणीस सांगण्याची आवश्यकता नाही. ज्या दोघांनी तिला तिचे हे प्रेम मिळवून देण्यास, प्रेम जिंकण्यास हातभार लावला होता, मदत केली होती, ते म्हणजे पाऊस आणि छत्री. त्या दोघांची ती आजही ऋणी आहे. ऐकुया तर वरील कहाणीवर आधारित एक पावसातील प्रेम-कविता. कवितेचे शीर्षक आहे-" माझा राजकुमार मला मिळाला " 

                    पावसातील प्रेम कविता
              " माझा राजकुमार मला मिळाला "
              ----------------------------- 

निमित्त फक्त पावसाचे होते
भिर भिर शीतल वाऱ्याचे होते
सर सर रोमांच उठवणारे होते,
चिंब झालेल्या तनुचे होते.

एक छत्री दिसली लांबवर
घेऊन उभा कुणी राजकुमार
हलकेच मग छत्रीत शिरले,
हळू हळू त्याचे हृदयी उतरले.

हे तर फक्त निमित्त होते
प्रेमाचे ते पहिले पाउल होते
पहाता पहाता मन जिंकून,
प्रेमाने दुसरे पाउल ठेवले होते.

माझे प्रेम मिळवून देणारे
ते दोन माझे सवंगडी होते
पावसाने आणी त्या छत्रीने,
माझे जीवन पूर्ण केले होते.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.06.2021-सोमवार.