विरह कविता - " भिजते आजही आसवांनी उशी "

Started by Atul Kaviraje, June 15, 2021, 11:27:47 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     प्रस्तुत कवितेतील प्रेमिकेचे आपल्या सजणावर निखालस ,निरागस,शुद्ध प्रेम असते. पण काही कारणास्तव त्याला तिला सोडून दूर-देशी कामाच्या निमित्ते जावे लागते, पुनरपि परतण्याच्या वचनांवर.  ही वेडी प्रेमिका त्याच्या परतण्याच्या वेड्या आशेवर असते. एक दोन वर्षे निघून जातात, पण त्याच्याकडून तिला काही सांगावा, निरोप येत नाही. 

     त्याच्या वाटेवर ती आजही  डोळे लावून बसली आहे, तिला अजूनही आशा वाटते, की तो परतेल आणि पुन्हा माझा होईल, ते चांगले दिवस पुन्हा येतील. पण तिचे ते फक्त मनाचे आभासचं असतात. तो काही परतून येत नाही. तिच्या प्रेमाची फसगत होऊन त्याचे अंती एका दुःखातच रूपांतर होते. आजही आपली नायिका ही त्याच्या प्रतीक्षेत आहे.

     तिचा आता प्रेमावरचा विश्वास उडाला आहे. ऐकुया   तर तिच्याच दर्द- भऱ्या  शब्दांत तिची हे प्रेमाची करून कहाणी, कवितेच्या शब्दांत - माझ्या कवितेचे शीर्षक आहे - " भिजते आजही आसवांनी उशी "

                            विरह कविता
                  " भिजते आजही आसवांनी उशी "
                  -----------------------------

सजणाचे नाही परतणे आता
नयनात नाही प्रतीक्षा माझ्या
रात्र केव्हाच गेली उलटुनी,
गुलाबाचे कोमेजणेच नशिबी त्याच्या.


खेळ झाला हा सगळा प्रेमाचा
वेळ निघून गेली आता
आता काहीच नुरले माझे,
प्राण नाहीत शब्दांत माझ्या.

भिजते तरी आजही आसवांनी उशी
एक आस धरून बसते वेडी मी मनाशी
माहिताहे आता परतुनी दिवस नाही येणार,
समजाविते मी कठोर मनास माझ्या.

     मित्रानो, या प्रेमाची परिणती इतकी  विदारक होईल असे वाटले नव्हते.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.06.2021-मंगळवार.