चारोळी -लेख - "राज्यकर्ते"

Started by Atul Kaviraje, June 19, 2021, 12:28:20 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                           चारोळी -लेख 
                            "राज्यकर्ते"
                           -----------

================
"राज्यकर्ते"
================


राज्यकर्त्यांच काही खर नाही
राज-कारणांच तर कधीच नही
मिळाले  जरी त्याना आधार - वोट,
का मध्येच बुडते त्यांची उधार - बोट ?
====================

मित्र/मैत्रिणींनो,

     आता थोडस हटके, राजकारणाकडे वळूया. नवीन सरकार निवडून आलय . मोदी सरकार आलंय. चांगल कार्य करतंय, गरिबांसाठी काहीतरी योनजा राबवितंय. अस ऐकलय, ऐकू येतंय, पण दिसत मात्र नाहीं. दिसेल, हळू हळू या पुढील पांच वर्षात, तेव्हा आपण सर्वांनी धीर धरलेलाच बरा.

     आतापर्यंतच चित्र अस होत कि, जे दिसत होत तस नव्हत ,निवडणुकीच्या आधी मतांसाठी येताना हात जोडून येत होते, मत मिळविण्यासाठी आश्वासनांचे मृगजळ दाखवीत होते, आणी निवडून आल्यावर हात दाखवून जात होते, सवलतींचे, योजनाचे अमाप पिक पिकवू असे सांगत होते, पण प्रत्यक्षात जनतेचा  मळा,जनतेचा हा अपेक्षांचा मळा, शेत ,शिवार कधीच फुलला  नव्हता. तो ओसाडच राहिला होता, जनता डोळ्यांत प्राण आणून वाट पाहत होती, कि हे सरकार मत घेण्यासाठी आले होते, आता उद्धार करण्यास केव्हा येणार ? पण हे त्यांचे वाट पहाणे म्हणजे निरर्थकच होते. सरकार परतून त्यांचे गावी केव्हाच आले नाहीं, बहुधा हि जनता त्यांचे गावीच नव्हती,


     निवडून आल्यावर ते आपल्याच  मौज - मस्तीत मग्न होते, दौरे काय, सभा काय, भाषणे काय आणि अनेक दाखविण्याच्या गोष्टी, पण प्रत्यक्षात परिणाम शून्य. मोठ मोठी भाषणे, पण कृती शून्य. कागदावर उतरलेल्या अनेक योजना, पण यांचे घोडे फक्त कागदावरच दौडणार.


     आता जनतेला याची चांगलीच सवय झाली आहे, तिच्या मनी प्रश्न उभा राहिलाय कि, या राज्य-कर्त्यांना झाले तरी काय ? नीट राज - कारण ते का करीत नाहीत, कि त्यांना माहित नाही, हे राज-कारण, कि नुसतेच डाव-पेच खेळत आहेत, आमच्याशी खेळ खेळत आहेत, राज - कारणाची अशी काही वाट लागू शकते, याची आम्हाला यापूर्वी कधीही कल्पना नव्हती, कोणीही उठतो आणी या क्षेत्रात बिनधास्त घुसतो, अशामुळेच तर या राज-कारणाचा बट्या बोळ होतो.


     आमच्याकडून जी मते, जी वोट घेतली जातात, ती त्यांची बोट तारण्यासाठीच तर असतात, तोच एक तर त्याना आधार असतो, आमच्याशिवाय ते काहीही करू शकत नाहीत, पण मग एवढी मते मिळूनही त्यांची हि बोट नेमकी  मध्येच का बुडते ? ती नैया ते पल्ल्याड का लावू शकत नाहीत ? त्यांची हि उधार - बोट ( म्हणजे फक्त ५ - वर्षांचे  प्रवासी, पुढील ५ वर्षासाठी नवीन प्रवासी त्यात भरणार आहेत) अशी नदी प्रवाहात, या राज-कारणाच्या प्रवासात मध्येच का बर उलटते ?


     मित्रानो, आहे का तुमच्याकडे वरील प्रश्नांना उत्तरे ? सापडली तर मला नक्की कळवा बरे !


" आम्हाला मते द्या
आम्हाला निवडून द्या
मग पहा आम्ही हे करतो,
मग पहा आम्ही ते करतो. "


     त्यांचे हे करतो आणि ते करतो, हे ऐकण्यातच गेली कित्येक वर्षे अशीच फुकट गेली आहेत.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.06.2021-शनिवार.