नवल कविता - " भीक मागती,अन होतात लखपती "

Started by Atul Kaviraje, June 20, 2021, 01:52:30 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आठ दिवसांपूर्वी एक धक्कादायक बातमी ऐकण्यात आली होती, भीक मागून एका भिक्षुकीणीने ( भिकारीण), तब्बल लाखांची माया गोळा केली होती, तिला नंतर पुनर्वसन  मोहिमे-अंतर्गत जेव्हा हलविण्यात आले, तेव्हा तिच्या छोट्याश्या खोलीत, तपास घेता, पालिकेच्या लोकांना, बरणीत जमविलेली सुट्टी नाणी, जुन्या गंजलेल्या पत्रा-पेटीत, दहा, पन्नास,  आणि इतर रोख , गड्डीच्या स्वरूपात अशी , जवळ जवळ दोन ते तीन लाखापर्यंत रक्कम आढळली.

     धन्य ती भिकारीण, आयुष्यभराची पुंजी तिने फक्त या भिक्षेतून  जमा केली होती. हे जगातील आणि एक नवल नाहीतर काय ? नंतर ते पैसे सरकार-खाती जमा करण्यात आले. पण सांगायचा मुद्दा, कि असेही घडू शकते, आणि ते अविश्वसनीय असते. गरिबी हा श्राप आहे असं म्हणतात, पण इथे तर परिस्थिती अगदी उलट दिसते, ही गरीब भिकारीण भीक मागून श्रीमंत झाल्याचे या गोष्टीतून स्पष्ट दिसत आहे. पण दुर्दैव इथेच, कि या पैश्यांचा उपभोग घेण्यापूर्वीच, तिची ती एकूण रक्कम सरकार जमा करण्यात आली, आणि शेवटी तिच्याकडे काहीच नाही उरले , तेव्हा या उक्तीचा पुन्हा नव्याने विचार करावयास हवा, आणि ते मनाला पटतही, की, गरीब हा गरीबच राहातो, गरिबी हा शाप असतो.

     असो, प्रस्तुत कविता उपरोक्त विषयावर लिहिली आहे, माझ्या कवितेचे शीर्षक आहे- " भीक मागती,अन होतात लखपती "

                     " भीक मागती,अन होतात लखपती "   
                     -------------------------------

आहे  फक्त आठ्यांचीच जाळी
जीर्ण सुरकुतलेली कातडी काळी
नियतीने लिहिलंय भाकीत गरिबीचं,
त्या भिकारणीच्या माथी-कपाळी.

गरिबी हा श्रापच जणू
हे जगणे, नाही जगणे
खितपत,पोटास घेऊन चिमटा,
खचत, पिचत आहे मरणे.

रस्त्याच्या कडेस पसरून पथारी
सोबत ठेवून भिकेची टोकरी
भीक मागुनी जगत होती,
आयुष्य गरिबीने कंठीत होती.

पण ऐका नवी नवलाई
कहाणी जगातील एका आश्चर्याची
वृद्ध भिकारणीचे पुनर्वसन होण्या,
घर मिळाले तिला राहण्या.

जुन्या घरी तपास होता
साऱ्यांच्या डोळ्यांत आश्चर्य डोकावले
भीक मागून आयुष्यभर कष्टाने,
होते तिने लाखो जमवलेले.

भिक्षा मागून जमवलेली माया
अशी  हातो-हात निघून गेली,
हाती तिच्या काहीही न राहाता,
रक्कम सरकार-खाती जमा झाली.

मागता - मागता भिक्षा, आयुष्य सरले
पाहता - पहाता नकळत वृद्धत्त्व आले
जमविलेली माया ही जणू मायाच होती,
लक्ष्मी ही शेवटी चंचलच होती.

गरिबी हा शापच आहे,
गरीब हा अंती गरीबच आहे
हयातभर जमवलेली पुंजी जाऊन,
शेवटी ती भिकारीण गरीबच आहे .


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.06.2021-रविवार.