तडका - लाटा कोरोना च्या

Started by vishal maske, June 21, 2021, 09:17:57 PM

Previous topic - Next topic

vishal maske

लाटा कोरोना च्या

कुठे कमी, कुठे शिल्लक
दवाखान्यात खाटा आहेत
एका पाठोपाठ एक अशा
कोरोना च्या लाटा आहेत

कोणत्या लाटेत कोणाला धोका
याचेही टार्गेट फिक्स आहेत
नव्या लाटेच्या उद्रेकासाठी
जुन्या लाटांचे साक्ष आहेत

ॲड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड
मो. ९७३०५७३७८३

Atul Kaviraje

      विशाल सर, "लाटा कोरोनाच्या", या चारोळी-संग्रहातून कोरोनाचे सद्य परिस्थितीचे उत्तम रित्या चित्रण आपण केले आहे. कोरोनाच्या एका पाठोपाठ एक अश्या महा-भयंकर, कराल, गिळंकृत करणाऱ्या लाटा येत आहेत. त्यासाठी, सरकारने बऱ्याच उपाय योजनाही केल्या आहेत. प्रथम लाटेसाठी व दुसऱ्या लाटेसाठी  जनता किंवा सरकार हे बिलकुल तयार नव्हते. पण आता बराच काळ लोटल्यामुळे, या लाटांचा अनुभव आल्यामुळे, जनता व सरकार, हे तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यास , तिच्याशी लढा देण्यास पूर्णपणे सक्रिय आहे.

     आशा करूया, की ही येणारी तिसरी लाट थोडक्यातच आटपेल ,आणि यानंतर एकही लाट येणार नाही. यासाठी जनता व सरकारने एकमेकांना सर्वथा सहकार्य देणे हे इष्ट ठरेल. आपली चारोळी छान वाटली.

     या लाटा थांबवायला हव्यात
     कोरोनाच्या लाटा सरायला हव्यात
     अक्राळ विक्राळ घेताहेत ग्रास,
     त्यांना ओहोटी लागायला हवी.

     कराल संकटास वेसण घालाया हवी
     बेगुमान भरतीस बांध घालाया हवा
     मग्रूर सागरास प्राशन करणाऱ्या,
     अगस्तींचा बाणा सर्वतोपरीच हवा.

     आज गरज आहे सर्वानी मिळून
     एकत्र हस्त साखळी गुंफण्याची
     मग अश्या कितीही येवोत लाटा,
     आवरण्या, धडाडीने पुढे जाण्याची.
   
     लाटा-संकट, यापुढे कधीही येणार नाही
     सर-सकट,त्यांचा बिमोड होत राहील
     निडर, निर्भय, मानव नवे जीवन जगेल,
     एकत्र होऊनच त्यांचे आयुष्य बदलेल.

----- श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-२२.०६.२०२१-मंगळवार.