पाऊस कविता - "पाऊस पडायचेच जणू विसरलाय"

Started by Atul Kaviraje, June 21, 2021, 11:07:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     गेल्याच आठवड्यात पाऊस चांगलाच धरला होता. अगदी मनासारखा, संततधार, अविरत असा पडत होता. असंही वाटत होत तेव्हा, की आता पुरे,  बस झाले. सारीकडे पाणीच पाणी भरले होते. मनुष्याची तारांबळ उडाली होती. रेल्वे गाड्या, बसेस,  व  इतर वाहनांची चांगलीच कोंडी झाली होती. त्यांची सेवा खंडित झाली होती.

     पण, त्यानंतरच्या दिवसांत, पावसाने  चांगलीच  उघडीप घेतली होती. तो नावालाही दिसत नव्हता. उष्म्याने त्याची जागा घेतली होती. त्याचा मनस्वी स्वभाव हा माणसाला पुरेपूर माहीत होता. असं वाटत होत की, तो जणू आपले काम विसरलाय. तो पडायचाच विसरलाय. इथे मुंबईत, तर लोक उकाड्याने एकवार पुन्हा हैराण होत होते. व पुन्हा पावसाची कामना करीत होते. मित्रानो, ऐकुया तर अश्या मुडी, मनस्वी पावसाची, ही अजब - गजब  सोप्या शब्दांतील दीर्घ कविता. कवितेचे शीर्षक आहे-  "पाऊस पडायचेच जणू विसरलाय"

                       पाऊस कविता
              "पाऊस पडायचेच जणू विसरलाय"
              -----------------------------

पावसाला झालंय काय आठवडाभर ?
पडायला , कोसळायला नाही तो तयार
सुस्तावलाय बहुतेक, घेतोय विश्रांती,
आठवड्यापूर्वीच त्याचे झाले होते अती.

विसरलाय, बिसरलाय की काय तो ?
अरे, तुझे दिवस आहेत सुरु
तुला पाहण्यास उत्सुक पुन्हा सारे,
असा अबोला नकोस धरू रे !

मुसळधार नको, निदान शिडकावा तरी
संततधार नको, फक्त रिपरिप तरी
कोपलाय जणू आमचेवर, रुसलाय बहुधा,
की दडी मारलीस, समजायचे काय यंदा ?

तू धावत आलास क्रुद्ध होऊन
की, कधी-कधी नकोसा वाटतोस
तू नसलास, नाही बरसलास जरी,
तर मग पुन्हा हवा-हवासा वाटतोस.

असे कसे तुझे  वागणे चमत्कारी ?
काय आहे यापाठी मिस्टरी ?
तुला कोणीच नाही ओळखले ,आजवर
तुला कधीच समजू नाही शकले,आजवर.

आता राग सोडून थोडे जल बरसू दे,
तुझा पित्याचा वरदहस्त माथी फिरू दे
त नाहीस तर, आम्हीही नाही,
त नाहीस तर जीवन (पाणी) नाही.

आम्हा सर्वांचा लाडका तू
एकदा पुन्हा तुझे दर्शन मिळू दे
पुन्हा तुझे हे आपलेसे रूप,
आम्हा नयनी साठवू दे.

तू आहेस मनात कायमचाच
जरी तुझा ऋतू नसला
तू आहेस कायमचा आमचाच,
जरी तू नाही दिसलास.

तुझे संगीत ऐकायचंय एकवार
तुझे गीत गायचंय हळुवार
वाट पहातेय सारी सृष्टी,
फिरव पुन्हा तुझी प्रेमळ दृष्टी.

तुला पाहूनच कविता स्फुरतात
इतर ऋतूंत नाहीय ती ताकद
लेखणी माझी आहे तयार,
जोपासलाय इथवर मी माझा छंद.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.06.2021-सोमवार.