खसखस पिकव्या मोबाईली चारोळ्या- " रेल्वे डब्यात झालीय मोबाईलची वस्ती "

Started by Atul Kaviraje, June 23, 2021, 01:35:53 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

              खसखस पिकव्या मोबाईली  चारोळ्या
            " रेल्वे डब्यात झालीय मोबाईलची वस्ती "
            -----------------------------------

१)  दाटी-वाटीने डबा भरलाय रेल्वेचा
     कोणीही नाही येथे कोणाचा
     मोबाईलवरून बोटे फिरताहेत नुसती,
     रेल्वे डब्यात झालीय मोबाईलची वस्ती.

२)  मान खाली, नजर खाली
     स्क्रीनवरून मोबाईलच्या बोटे पहा फिरली
     प्रत्येक स्थानकावर थांबतेय गाडी,
     पण वेळ कोणा पहाण्या (घड्याळ) घडी.

३)  रिंगा मोबाईलच्या प्रत्येकाच्या किंचाळताहेत
     गाढ झोपलेल्या सह-प्रवाश्याना जागवताहेत
     तू-तू, मी-मी ला सुरुवात होतेय हळू-हळू,
     हे पाहून सर्व मोबाईल लागलेत खिदळू.

४)  मोबाईलवर बोलून झोपी गेलेत प्रवासी
     थकलेत बिचारे, संभाषण आलंय अंगाशी
     वाट पाहून कंटाळले, चैन पडेना मोबाइलना,
     संपर्क करू लागलेत ते स्वतः आता एक-मेकांना.

५)  आज प्रवाश्यांकडे नसतो डबा
     आज प्रवाश्यांकडे नसतो खंबा
     परी मोबाइलविना प्रवास नाहीय त्यांना शक्य,
     जीवन मोबाइलविना आहे, अपूर्ण अन अशक्य.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.06.2021-बुधवार.