वात्रटिका - "दुखणे कविचे"- भाग-१

Started by Atul Kaviraje, June 24, 2021, 01:26:56 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                     वात्रटिका
              "दुखणे कविचे"- भाग-१
              ---------------------

( १ )
कवी-संमेलनात उत्साहाने करीत होतो वाचन
वाटले टाळ्यांचा होईल गजर
श्रोते सारे लागले  होते घोरू,
उद्याचा उठण्याचा लावून गजर.


( २ )
जाग येते मला दचकून
कवितेतला चंद्र स्वप्नातच हरवतो
चुलीत घाला तुमच्या कविता,
जेव्हा बायकोचा आवाज गरजतो.


( ३ )
बक्षिसे मिळाली, बरीच पदके मिळाली
जेव्हा होतो ऐन भरात
आज कोणीही विचारीना मला,
तेच-विकून खाण्याची पाळी आली.


( ४ )
सांगणे माझे एक तुम्हाला
कवि कधीही होऊ नका
रविलाच पाहू-दे सर्व काही,
अंधाराचे साक्षीदार होऊ नका.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.06.2021-गुरुवार.