चारोळी-लेख - "वट-पौर्णिमा"

Started by Atul Kaviraje, June 24, 2021, 10:46:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                चारोळी-लेख
                                -----------

===============
वट-पौर्णिमा
===============


झाडे वाचवूया, पर्यावरण राखूया
सुजलाम,सुफलाम हरितक्रांती आणूया
वट-पौर्णिमेच्या दिनी एकच संदेश,
सर्व झाडे देवांची पूजा करुया.
======================

     आज वट -पौर्णिमा आहे . त्या-निमित्ते एक लेख पुढीलप्रमाणे.

     ही झाडेच तर आपले खरे मित्र आहेत, पर्यावरण मित्र आहेत, जमिनीची धूप होण्यापासून ते तिला मदत करतात, सगळीकडे हिरवाई आणतात, हरीताई खेळवतात, मनुष्याच्या ते तर खूपच उपयोगी पडतात, फळे फुले देण्यापासून ते इतर बऱ्याच दृष्टीने त्यांचा दैनंदिन जीवनात वापर होत असतो, म्हणून तर त्यला कल्पवृक्ष म्हणतात, आणी अश्या या आपल्या जीवन - दात्यावर कुऱ्हाड चालविणे हे कितपत योग्य आहे?


     मित्रानो, झाडे वाचवा, झाडे जगवा, झाडे लावा, या वट-पौर्णिमेच्या पावन पर्वावर चला तर त्याची पूजा करूया, सर्वच झाडांची पूजा करूया, आणी एक संकल्प करूया, कि असे एक तरी रोप लावूया, कि ज्याचा पुढे जाऊन एक कल्प-वृक्ष होईल, भविष्यात एक पूर्ण वृक्ष होईल, जो आपल्याच कामी येईल, याची रुजुवात आजच आतापासूनच करूया, आपण  जर झाडे आज जगवली तर ती आपल्याला आपल्या भविष्यात जगवतील . ही झाडेच आपले देव आहेत .


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.06.2021-गुरुवार.