चहा हास्य-चारोळ्या - " देवांनाही दुर्लभ, अमृत-तुल्य चहा "भाग-१

Started by Atul Kaviraje, June 25, 2021, 01:50:22 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                चहा  हास्य-चारोळ्या
         " देवांनाही दुर्लभ, अमृत-तुल्य चहा "
         -------------------------------

१)  हात उंचावून कपातला चहा
     आकाशातल्या देवांस अर्पण करतो
     अमृतासही लाजविणाऱ्या चहाचे मग,
     गरमा-गरम घोट घेतो.

२)  सकाळ माझी चहाने होते
     दुपारी झोपत नाही चहाशिवाय
     संध्याकाळच्या चहाची लज्जतच न्यारी,
     जेवणा-नंतर वाफाळलेला चहा लागतो रात्री.

३)  चहा प्याल्याने वाढते आयुष्य
     ऐकले होते कुठूनसे,केव्हातरी
     रात्रं-दिवस ढोसतोय मी चहा मन-मुराद,
     चहाची लागवड करून गच्चीवरी.

४)  हॉट-ड्रिंक मी सोडलंय आज-काल
     हॉट चहाला देतोय प्राधान्य
     थकवा जाऊन, तकवा येण्याचे,
     पेय नाही दुजे अन्य.

५)  देव उतरले स्वर्गातून धरतीवर
     पाहण्यास माझा चहा-प्राशनाचा छंद
     बदल्यात  ते देण्यास होते तयार,
     अमरत्त्वाचे अमृत-तुल्य थेंब कुपी-बंद.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.06.2021-शुक्रवार.