तुझा मी अपराधी

Started by sunitsonnet, June 25, 2021, 02:30:19 PM

Previous topic - Next topic

sunitsonnet

तुझा मी अपराधी
अपराध पोटात घाल एकदा

चुकतोय हे माला कोणी
सांगितलच नहीं
ज्या वेडिन माझ्यावर
जिवापाड प्रेम केल
तिला सोडुन जाताना
साध शेवटच भेटलोही नहीं
जेव्हा कळली मला तुझी किम्मत
हारून गेलो माझी हिम्मत
खुप शोधल त्या चौकाकातुन
नजर भिरभिरली गल्लोगल्लीतुन
न दिसलिस कोठे ना ठाव ठिकाना
उपवास केला पंधरा वर्ष
पत्र लिहिली तर्हे तर्हे ची
ती ही द्यावी कोना लागी
राक्षस वृत्ति स्मरण देवता
क्षणात जागी झाली
प्रेमाचा तर मीच शत्रु
दूसने देणार कोणास
हुरहुर मनात सतत राहिल
तुला न भेटल्याची न बोलल्याची
जेवढ प्रेम तू माझ्यावर केल
तेवढ मि मजवर नाही केल

तुझा मी अपराधी
अपराध पोटात घाल एकदा
घाल एकदा...
घाल एकदा... ....

-स्वरचित
सुनीत Sonnet


Atul Kaviraje

सुनीत (Sonnet) सर,

     "तुझा मी अपराधी", या आणि एका विरह-कवितेतून ,आपल्या हातून एक अक्षम्य अपराध घडला आहे, याची या कवितेतील नायक प्रांजळपणे कबुली देत आहे. गत काळी, भूत काळी, माझ्या हातून तुझ्या बाबतीत अनेक चुका घडल्या, त्या घडावयास नको होत्या, असं तो नायक म्हणतो . पण याची उपरती जेव्हा त्याला आता झाली, तेव्हा वेळ निघून गेली होती. आता खूपच उशीर झाला होता.

     आता त्या नायिकेने , एकदा तरी आपल्या चुका उदार अंतःकरणाने पोटात घालाव्यात, असं त्याला मनापासून वाटत आहे, नव्हे त्याला तिची कळकळीची विनंती आहे. कवितेचा विषय आवडला.

    चूक माणसांकडूनच होत असते
    अपराधाची भावना येत असते
    चुका घडू नये पुन्हा पुन्हा,
    सर्वतोपरी काळजी वाहायची असते,

     जीवाला चटका लावून जाणारे
     असे वर्तन घडू नये
     नंतर यावी पाळी पच्छातापाची,
     आणि भावना उरी अपराधाची.

     गत आयुष्याची आठवणींची वावटळ
     फिरवीत बसते आपणा गरागरा
     विस्मरणच त्याचे सर्वार्थाने व्हावे
     हाच अंतिम मार्ग खरा.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.06.2021-सोमवार.