काय सांगू त्या जुन्या आठवणीं कवटाळून जगतो आहे

Started by sunitsonnet, June 25, 2021, 02:49:21 PM

Previous topic - Next topic

sunitsonnet


काय सांगू
त्या जुन्या आठवणीं कवटाळून जगतो आहे
हसऱ्या चेहऱ्याच्या मागे
खरा चेहरा लपवतो आहे
एक स्वर तुझा पडावा 
कानी म्हणून झुरतो आहे

मला तू  दिलेला प्रत्येक आवाज
मजला आजही वाटतो कोकिळे समान
त्या सुमधुर आवाजस
मी पोरका झालो
माझीच ती चूक हाती
कोणास दुसने देनार
त्याची शिक्षा फार भोगली
माफी मागण्याची सोयच नाही

तुझ नाव कानी पडताच
नजर स्वैरभैर न्याहळते चेहरे
त्या चेहऱ्याआड दुसऱ्याचा
चेहरा पाहून मन खिन्न
पुनः नव्या दमाने नाव तुझं
ऐकण्या मनात हुरहूर

काय सांगू
त्या जुन्या आठवणीं कवटाळून जगतो आहे
हसऱ्या चेहऱ्याच्या मागे
खरा चेहरा लपवतो आहे
एक स्वर तुझा पडावा
कानी म्हणून झुरतो आहे

-स्वरचित
सुनीत Sonnet

Atul Kaviraje

सुनीत (Sonnet)सर,

     पुन्हा एकदा भावना-विवश करणारी ही आपली विरह-गाथा. त्या आठवणी पुन्हा एकदा नव्याने आपल्या सद्य जीवनात आपणास आठवत आहेत, इतकं की काही केल्या त्यांना आपण विसरू शकत नाहीत, त्या आपल्या अंतर्मनात ठासून भरल्या आहेत.

     हा विरह, हे दुःख विसरता यावे यासाठी, फक्त एक सुस्वर कानी पडावा, म्हणजे साऱ्या दुःखाचे परिमार्जन होईल असं आपणास वाटत आहे. हे दुःख लपविण्यासाठी आपणास काय प्रयास करावे लागले हे आपल्या "काय सांगू त्या जुन्या आठवणीं कवटाळून जगतो आहे", या विरह कवितेतून स्पष्ट जाणवत आहे. आता हे आयुष्य त्या जुन्या आठवणीतच कंठायचे, असा तुमचा मानस आहे.कविता छान आहे.

     आयुष्यात सुखे कमी, दुःखेच अपार
     या दुखातच पाहायचे असते सुख
     प्राक्तनात असेल तेव्हढेच गवसते,
     गेले त्यासाठी झुरायचे नसते.

     पुन्हा नव्याने जगायचे जीवन
     आयुष्य फार आहे सुंदर
     पुन्हा नव्याने लावून पंख,
     झेप घेऊनि पाहावे अंबर. 

     जुन्या आठवणींना विसरू नये
     भूतकाळात जीव रमून जावा
     परी भविष्याचा वेध घेता
     वर्तमान ही नजरेत असावा.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.06.2021-सोमवार.