किती त्या अवीट आठवणी

Started by sunitsonnet, June 25, 2021, 03:18:08 PM

Previous topic - Next topic

sunitsonnet


किती त्या अवीट आठवणी
मला एकदा कळलं
माझी चिमणी आजारी
तेव्हाही फार शोधलं
भेटली कोठेही नाही

देवीकडं गेलो अनवाणी
उपवासाच साकडं घातलं
बरी कर चिमणीला म्हणून
आठरा वर्ष मंगळवार केलंल
एकदा संकटकाळी वृत्त तोडलं

चिमणीच्या आठवणी जपता
वाटते मी ही होईन आठवण
कंठ दाटून येतो हीच तर खरी प्रीत
जेवढं दूर गेलो तेवढी प्रीत अवीट झाली

वाटते आकाशी उंच भरारी घावी
चिमणी हि माझी वाट पाहत असेल ना?
पटते  तिच्या संसारात का मीठ बनावे
पुन्हा माझ प्रेम होत पराभूत

किती ती चुलबुल माझी चिमणी
किती त्या अवीट आठवणी
किती तो गोडवा किती ते आपलपण
किती त्या अवीट आठवणी

-स्वरचित
सुनीत Sonnet

Atul Kaviraje

सुनीत (Sonnet) सर,
 
     पुन्हा एकवार त्या अवीट, अमीट आठवणी, पुन्हा एकवार चिमणा-चिमणीच्या रूपात. चिमणी आजारी असताना त्या चिमण्याने  जे जे काही तिच्यासाठी केलं त्यास तोड नाही. भूतकाळात मन वावरताना मनास वाटणारी खंत, त्यास होणाऱ्या वेदना, त्यापासून होणार त्रास, हे सारे आपण आपल्या "किती त्या अवीट आठवणी", या विरह कवितेतून सांगितल्या आहेत.

     या आठवणी आपली काही पाठ सोडत नाहीत, आणि बहुतेक यापुढे या आठवणीवरच राहायचे, जगायचे आपण ठरवलेय. आपल्या यापूर्वीच्या सर्व कवितांना तोड नाही. अतिशय बारीक पणे, मुद्द्यांसहित आपण त्यांचे विस्तृत कवितारूपी कथन केले आहे. "KEEP  IT  ON  BROTHER " .

     पुन्हा एकदा अवीट आठवणी
     सुख-दुःखांच्या अमीट साठवणी
     सजवलीय त्यांची मी फुलदाणी,
     रोज गातो मी त्यांची गाणी.

     विसरता येत नाही ती करुण कहाणी
     होत होती केव्हातरी प्रेमाची फाळणी
     मागे वळून करताना  पहाणी,
     आपसूक शब्दांतून जन्म घेते विराणी.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.06.2021-सोमवार.