माझी चिमणी

Started by sunitsonnet, June 25, 2021, 03:37:58 PM

Previous topic - Next topic

sunitsonnet


एक चिमणा त्याच्या प्राण प्रिय
चिमणीला सोडून जात होता
जाता जाता एकदातरी चिमणीला
भेटावं म्हणून तडफडत होता
आकाशी उंच भरारी घेताना
सतत मागे वळून पाहत होता

तिचे व आपले हुंदके आवरता आवरता 
चिमणीचा निरोप घेता आला नसता 
या आकांतानं फार चिवचिवाट केला
डोळ्यातलं पाणी परतवत तो तसाच गेला

इच्छा नव्हती सोडून जाण्याची
इतकं दूर जाण्याची
जेथून परत येणे शक्य नसेल
तितकं दूर जाण्याची

चिमणीने आपला वेगळा मार्ग पकडला होता
चिमणीचा निर्णय हा तीचा आपला नव्हता
शेवटी चिमणा चिमणीच्या नजरेआड झाला
रोखून धरलेल्या अश्रुंचा धबधबा कोसळून गेला

चिमण्याचं नाजूक मन चिमणीसाठी वेडावलं होतं
तिला मिळवायचं तर कोणा कोणासह झगडायचं
तीचं सासर होतं तीच महेर होतं तिचं माझ नातं होतं 
वेड्या चिमणीला हा संघर्ष सहन झाला नासता

म्हणून चिमण्यान तिची भौतिक साथ सोडली
मात्र मनानं दूर जाणं शक्य नव्हतं
चिमणा चिमणीची नाळ मनानं जुळली होती
म्हाणून शब्दांशिवाय ती नाळ सतत साद घालत होती

एकदा दिसेल का हो माझी चिमणी
या शरीरातला प्राण संपन्याच्या आत
माझी चिमणी
माझी चिमणी

-स्वरचित
सुनीत Sonnet

Atul Kaviraje

सुनीत (Sonnet) सर,

     चिमणा-चिमणीचेही एक जग असते, त्यांनाही काही भावना असतात. अर्थातच  "माझी चिमणी", या विरह कवितेतील चिमणा चिमणी चा संदर्भ आपल्या जीवनासही लागू पडतो, हे कविता वाचल्यावर लक्षात आले. त्या दोघांची भेट, त्यांचा एकत्र संसार, एकत्र राहणे, अंती दोघांतील विरह, या गोष्टींचे आपण उत्तम चित्रण केले आहे. जीवनाशीच निगडित ही आपली विरह कविता, मन उदास करून जाते. मन सुन्न होते.

     काही कारणास्तव दोघांत झालेला हा विरह, ताटातूट आपण कडव्यात छान रंगविला आहे. पुन्हा एकवार भेटण्याची इच्छा धरून, आपण आपल्या कवितेचा शेवट केला आहे. कवितेतील गर्भितार्थ आवडला.

     हेच तर जीवन असत
     असंच नेहमी घडत असत
     मनांतून कुणी आवडत असत,
     पण कधीही व्यक्त होत नसत.

     व्यक्त करण्याची मिळता संधी
     खूपच उशीर झालेला असतो
     आवडलेलं कुणी परक्याचं होताना,
     नियतीचा सारा फासाच उलटा दिसतो.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.06.2021-रविवार.