माझ्या कृष्ण धवल आयुष्यात

Started by sunitsonnet, June 25, 2021, 04:01:55 PM

Previous topic - Next topic

sunitsonnet


माझ्या कृष्ण धवल आयुष्यात
आस होती तुझ्या एका तरी भेटीची

पण प्रत्येक वेळी धावून आल्या
तुझ्या त्या गोड आठवणी

आयुष्याच्या उतरणीला नसेल तुझा सहारा
तरीही मी तुझी आस सोडणार नाही

उदास असतो तेव्हा तुच दिसतेस
मग मनोमनी  मी करतो पूजा तुझी

अर्पण करतो तुझं चरणी मी मोगरा जाई जुई
भानावर येताच दिसते केवळ सदाफुली

गंध फुलांचा पुन्हा एकदा दरवळेल का
या पामराच्या आयुष्यामधी

माझ्या कृष्ण धवल आयुष्यात
आस होती तुझ्या एका तरी भेटीची

-स्वरचित
सुनीत Sonnet

Atul Kaviraje

सुनीत (Sonnet )सर,

     प्रस्तुत, "माझ्या कृष्ण धवल आयुष्यात", या आपल्या विरह कवितेतील नायक हा पुन्हा त्या आठवणींत रमून गेल्याचे दिसत आहे. भूतकाळात घालवलेले आपले प्रेमिकेसह चे सुखाचे क्षण त्याला प्रकर्षाने आठवतात. पण नंतरच्या त्याच्या जीवनात येणारे चढ  -उतार, त्याला तिच्यापासून वंचित करताना दिसतात. त्याला तिच्यासोबतचे ते क्षण पुन्हा जगावेसे वाटत आहेत.

     आयुष्याच्या या संध्याकाळी, त्याला  फक्त तिच्यासह घालवलेले  गोड  क्षण, मधुर आठवणींच, उर्वरित आयुष्यात सोबत राहातील, असं वाटत . तरीही तो तिच्या फक्त दिसण्याची एक आस,  मनी धरून आहे. केव्हाही न केव्हातरी ती मला भेटेल, या आशेवरच तो आपले जीवन कंठीत आहे. सुनीत सर, वाचकांना हि कविता वाचता, खिळवून ठेवण्याची ताकद, आपल्या लेखणीतून मला जाणवली. अश्याच उत्तमोत्तम विरह कविता सादर करणे. 

      परतुनी माघारी आता जाणे नाही
      पुन्हा ते आयुष्य आता जगणे नाही
      मनी खंत, एक दुःख उरी आजही आहे,
      त्या आठवणींतच फक्त जगायचे आहे.

     आठवा उजाळा यात काहीही तथ्य नाही
     केवळ भावनांचा उमाळा, हेच सत्य आहे
     या वास्तवातच राहायचे यापुढेही आहे.
     आयुष्यातच हे एकचं भान राखायचे आहे.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-२६.०६.२०२१-शनिवार.