उरलेल्या आयुष्यात... दोन तरी पावल तुझ्यासोबत चालावस वाटतय

Started by sunitsonnet, June 25, 2021, 04:07:08 PM

Previous topic - Next topic

sunitsonnet


उरलेल्या आयुष्यात...
दोन तरी पावल तुझ्यासोबत चालावस वाटतय
आयुष्यभरासाठी या आठवणींना
मनात साठवून ठेवावस वाटतय...

उरलेल्या आयुष्यात...
पापण्यांमधून अलगद ओघळणाऱ्या
आसवांना भरभरून वाहण्याची
वाट मोकळी करून द्यावी असं वाटतय ...

उरलेल्या आयुष्यात... 
काळजाच्या  खोल कप्प्यात साठवून 
ठेवलेली मूर्ती पुन्हा वर काढून
आसवांच्या अमृतजलाने धुवून घ्यावी अस वाटतय...

उरलेल्या आयुष्यात...
तुझ्या आठवणींची शिदोरी
रीती होनार तर नाही ना
याची काळजी करावी अस वाटतय... 

उरलेल्या आयुष्यात...
तुझ्या कुशीत डोकं ठेऊन
एकदा तरी आयुष्यभराचं मन
मोकळं करावं मनोमन असं वाटतय...

उरलेल्या आयुष्यात...
दोन तरी पावल तुझ्यासोबत चालावस वाटतय
आयुष्यभरासाठी या आठवणींना
मनात साठवून ठेवावस वाटतय...

-स्वरचित
सुनीत Sonnet

Atul Kaviraje

     सुनीत (Sonnet )सर,

     आपल्या सर्व विरह कविता मी मनापासून वाचल्या. सर्व कवितांमध्ये "आठवण" आणि "आयुष्य" हे दोन शब्द मला अंतर्भूत असल्याचे प्रकर्षाने जाणवले. प्रस्तुत, "उरलेल्या आयुष्यात... दोन तरी पावल तुझ्यासोबत चालावस वाटतय", या कवितेत, ज्या गोष्टी, कवितेतील नायिकेला किंवा नायकाला आयुष्यभर करता नाही आल्यात, त्या केवळ आठवणींवरच  उरल्यात, त्या त्यांना आता त्यांच्या या उरलेल्या आयुष्यात कराव्याश्या वाटत आहेत.

     आयुष्य पण कसे, तर उरलेले हे आयुष्य  दोन क्षणाचे, फक्त दोन पावलांचे आहे. त्या दोनच क्षणांमध्ये त्या साऱ्या आठवणी जागवून त्यात फक्त जगायचंय.  उरलेल्या आयुष्यात आणि त्या आठवांसह दोन तरी पाऊले चालायचंय. अतिशय सुंदर समर्पक अशी हि विरह  कविता आहे.


     थोडेसेच असते आयुष्य , पहाता निसटून जाते
     मनातून तर खूप काही करायचे असते
     पण वेळ असतो कमी, काळ असतो वरचढ,
     पाठी वळून पाहता, भावनांना येतो कढ.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.06.2021-शनिवार.