गोड चौकलेटी विनोदी कविता - "चौकलेट हृदयासाठी खा ,चौकलेटी हृदयाचे व्हा !"

Started by Atul Kaviraje, June 26, 2021, 02:24:20 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र /मैत्रिणींनो,

     मागे  केव्हातरी , पेपर -मध्ये  बातमी  वाचली  होती , कि  चौकलेटचे  सेवन  केल्यामुळे  हृदय -रोग  होत  नाहीत , हृदयाला  बळकटी  येते , ते  मजबूत  होते , त्याला  कुठलाही  आजार  होत  नाही , त्याच्या  नियमित  होणाऱ्या  कार्यातही  कित्येक  पटींनी  सुधारणा  होते , आणि  माणसाचे आयुष्य  वाढून  तो  पुढे  अनेक  वर्षे  जगतो.

    किती  खरं  आणि  किती  खोटं  यात ? ते  माहीत  नाही . परंतु  जिभेच्या  चवीला  एक  स्वादिष्ट  गोड  अनोखा  पदार्थ  या  चौकलेटच्या  निमित्ताने  मिळालाय , हेही  तितकंच  खरं .

    असो , मला  तर  एक  विषयच  मिळाला , कविता  स्फुरण्यास . ऐकुया  चला  तर , ही  चौकलेटसारखी  खुमासदार , खुसखुशीत , अति -गोड , जिभेवर  साखर  घोळवणारी,  रुचकर ,स्वादिष्ट  कविता . कवितेचे  शीर्षक  आहे - " चौकलेट  हृदयासाठी  खा , चौकलेटी  हृदयाचे  व्हा  !"

              गोड  चौकलेटी  विनोदी  कविता
      "चौकलेट हृदयासाठी खा,चौकलेटी हृदयाचे व्हा!"
      -----------------------------------------

गरज  आहे  जननी  शोधाची
शोध  घेता  जाणवले  एकासी
हृदय -रोगावर  आहे  चौकलेट  रामबाण ,
चौकलेट  खाऊन  चालवावा  हृदय -बाण .

वृद्धांची  चाललीय  चांगलीच  चंगळ
चौकलेट  खाऊन , टाकताहेत  गळ
हृदयरोग  होतोय  कायमचाच  बरा ,
घात आणि आघात ,नाही करीत त्यांना जरा (वृद्ध ).

खाऊन  रोज  वारेमाप  चौकलेटे   
हृदये  होत  चाललीत  चौकलेटी
वृद्धांचा  जन्म -दर  वधारत  चाललाय ,
तरुणांचा  मार्केट -दर  घसरत  चाललाय .

चौकलेटच्या  दुकानांत  गर्दी  उसळलीय
औषधांची  दुकाने  ओस  पडलीत
शेजारचे  आजोबा  वीस  किलोमीटर  धावून ,
वर  दंड -बैठकाही  काढू  लागलेत .

अटॅक -बीटॅक  काहीही  येत  नाही
दररोज  नेमाने  दोन  किलो चौकलेटे खा
दुकाना -दुकानांवर  दिसताहेत  कोरीव  आकर्षक  पाट्या ,
चौकलेट  हृदयासाठी खा , चौकलेटी हृदयाचे व्हा !


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.06.2021-शनिवार.