आठवतात ते अवीट क्षण

Started by sunitsonnet, June 26, 2021, 08:18:27 AM

Previous topic - Next topic

sunitsonnet

आठवतात ते अवीट क्षण
दिसतात त्या पाऊल खुणा
वाटते करावे पुन्हा सिंहावलोकन
काही खुणा सुखवणाऱ्या
काही मनाला टोचणाऱ्या

हरवून जातो त्या क्षणामध्ये
एवढेच माझ्या हातामध्ये
दोन तापानंतर सुमधुर स्वर
पुन्हा कानी पडला
माझं नाव ऐकताच तुलाही
सर्व काही आठवलं असणार
मन पुन्हा तारुण्यात गेलं
बागडलं बेधुंद मधहोश झालं
आठवणीतील तो प्रत्येक क्षण
स्मरण पटलावरून पुढे सरकला

वास्तवात आलो तेव्हा आकांताने
पुन्हा त्या नगरी शोध घेतला
ना भेटलीस ना दिसलीस तू
तरी ही आनंदी बेभान मी
काही तरी शोध लागला
शोध लागला
शोध लागला

स्वरचित
सुनीत  Sonnet 

Atul Kaviraje

     सुनीत (Sonnet )सर,

     प्रस्तुत "आठवतात ते अवीट क्षण", या विरह कवितेतून आपण त्या आठवणींना पुन्हा नव्याने उजाळा दिला आहे. कवितेतील नायक हा त्या आठवणींमधून पुन्हा एकदा भूतकाळात जातोय. तेव्हाचे ते त्याचे घालवलेले नायिकेसह प्रेम दिवस, काही सुखद तर काही दुःखद आठवणी , त्याला आठवतात, तिथे तो तिचा शोध घेण्याचा प्रयत्नही करतो.

     पण त्या आठवणीत रमून कवितेतील प्रेमी जेव्हा वास्तवात येतो, तेव्हा त्याला सत्य हे कळून चुकते, आपल्या प्रेमिकेचा शोध घेता त्याला ती काही तेथे सापडत नाही, तरीही त्याच्या मनाला काहीतरी गवसल्याचा एक अपरिमित आनंद होतो. सुंदर गर्भितार्थ असलेली आपली हि विरह कविता आवडली.

     जावे केव्हा तरी आठवांच्या गावा
     ऐकावा तेव्हाचा सुरेल मारवा
     ऐकता, हाती तिचा हात असावा,
     तिच्या डोळ्यात तो स्पष्ट दिसावा.

     तिचा सहवास आजही आठवावा
     जगण्याचा तोच एक मार्ग असावा
     लपविण्याचा कितीही केला प्रयत्न
     तरी वाहणाऱ्या आसवांतून तो दिसावा. 

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-२६.०६.२०२१-शनिवार.