वास्तव-विनोदी-नवल कविता-"आता नाही राहिले टेन्शन, खाती ते फुकट पेन्शन"

Started by Atul Kaviraje, June 29, 2021, 11:31:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     माझ्या  पुढील कवितेचा विषय आहे, "मृत व्यक्तीस जिवंत दाखवून पेन्शन घोटाळा". काही दिवसांपूर्वीच यु - ट्यूबवर एक बातमी ऐकली आणि पाहिली होती, की, मृत व्यक्तीस सरकारी खात्यात अजूनही जिवंत दाखवून, पेन्शन खात्यास चकवून, चक्क त्यांचा डोळ्यांत धूळ फेकून, त्या मृत व्यक्तीची मिळणारी निवृत्ती नंतरची पेन्शन, त्याचे नाते-वाईक कितीतरी वर्षे खात होते, त्या पेन्शनचा अगदी फुकट उपभोग घेत होते.

     घोटाळे आजवर खूप पाहिले आणि ऐकलेही होते. परंतु हा घोटाळा, घोटाळाच्या दुनियेतील एक नवलच होता, ना भूतो न भविष्यती, असा हा आपल्या परीने, एकच एक होता. धन्य ते नाते-वाईक, की आपल्या मृत नातलगांस, कागदोपत्री जिवंत दाखवून त्याची चक्क पेन्शन खात होते, तेही अगदी निलाजरेपणे. त्यांना असं करताना अजिबात देखील जाणीव झाली नव्हती, की, आपण या घोटाळ्याच्या रूपात एक गुन्हाच करीत आहोत.

         कित्येक कुटुंबाच्या कुटुंबे, आणि सरकारी खाते, या घोटाळ्यात त्यांचा सक्रिय हात होता, हे सांगायलाच नको. खरोखर, विश्वास बसत नाही, अशी हि गोष्ट आहे. या अखिल दुनियेत आणि किती आश्चर्ये घोटाळाच्या रूपात दडली आहेत, लपली आहेत, हे आपण आजच्या घडीला सांगू शकत नाही. या घोटाळ्यावर मला एक कविता सुचली आहे. ऐकुया तर, या अनोख्या घोटाळ्यावर, मार्मिक, विनोदाची झाक असलेली, व्यंगात्मक, वास्तव, नवल कविता.  कवितेचे शीर्षक आहे -  "आता नाही राहिले टेन्शन, खाती ते फुकट पेन्शन"

     
                  वास्तव-विनोदी-नवल कविता
       "आता नाही राहिले टेन्शन, खाती ते फुकट पेन्शन"
       ------------------------------------------



घोटाळ्यात घोटाळा, घोटाळ्यांची नवलाई
नातेवाईक खाती दुधावरली मलई
बसून गिळायची, झालीय सवय,
गिळायला नसते अक्कल अन वय. 

मृतात्म्यास श्रद्धान्जली आसवांची वाहून
नातेवाईक काढती आठवण राहून-राहून
पण गोष्ट वेगळीच, नवल वाटेल ऐकून,
कानांवर विश्वास कोणाच्या नाही राहील बसून.

देवाघरी गेलाय, सारे भोग भोगून
या संसाराच्या भव-सागरातून तरून
मृत व्यक्तीस सरणावर जाळून,
नातेवाईक झालेत मोकळे, तेरावे घालून.

पण नंतरच येतो दर्शनासी घोटाळा
लांडी-लबाडीचा, लाच-लुचपतीचा पचवून अख्खा कोहळा
खात्यात सरकारी, मृत व्यक्तीस दाखवून जिवंत,
नावावरची पेन्शन सहज होतेय गिळंकृत.

घोटाळ्यात कुणा-कुणाचे हात रंगलेत
कोण-कोण कुठे, किती पोचलेत
निलाजरे मन, स्वतःचीच लाज नाही,
जनाची तरी काय ठेवतील, थोडीशी काहीबाही.

स्वर्गातून मृतात्मा आश्चर्याने पहातोय
स्वतःच्याच नातलगांना मनोमन कोसतोय
जिवंतपणी माझा केला सदैव धिक्कार,
आता मी मृत आहे, तर चाललेत हे प्रकार.

वहात चाललीय कुठे संस्कृती ?
हीच का आहे अति-शिक्षणाची पावती ?
खरोखरच, घोटाळा करण्यास लागते अक्कल,
मगच सुचते अशी अशक्य शक्कल.

जिवंतपणी पैश्यांसाठी पुरते पिडले
आता मरणानंतरही त्यास जिवंत दाखविले
हे माणसा, कोठवर चाललास अधोगतीस,
ऐकले नव्हते हे नवल, आजमितीस .

मृताचे घातले जातेय आजही श्राद्ध
नातेवाईक झालेत नियमास कटिबद्ध
अजूनही मासिक येतेय पेन्शन,
बिनदिक्कत खाती, काहीच नूरलय टेन्शन.

जोवर नजरेतून सुटतोय घोटाळा
आवळा देऊन खाल्ला जातोय कोहळा
परि, जेव्हा फुटेल त्यांच्या भ्रमाचा भोपळा,
सरेल आजवरचा फुकट खाण्याचा सोहळा.

पेन्शन खात्यावर असावे, नियंत्रण सरकारी खात्याचे
अधिकारी असावेत पुरस्कर्ते प्रामाणिकपणाचे
अटक व्हावी समाज-कंटकांस,दावावी जेलची खोली,
तेव्हाच मिळेल त्या मृतात्म्यास खरी श्रद्धांजली.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2021-मंगळवार.