प्रश्न

Started by शिवाजी सांगळे, June 30, 2021, 06:17:22 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

प्रश्न

कुठवर असं चालायचं...एक प्रश्न
कुठवर असं चालायचं..दुजा प्रश्न

मुक्काम आणि उत्तर सापडे पर्यंत
फक्त स्मरत रहायचा एवढाच प्रश्न

वास्तविक अन् एक परिस्थितीचा
उद्भवतो मनी कायम असला प्रश्न

मिळते उत्तर, गंतव्य ही समोर येते
तरी विसरू नये कधी मनीचा प्रश्न

सजग,सावध करीत मार्ग दाखवतो
नित्य, निरंतर मनामधला हाच प्रश्न

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Atul Kaviraje

शिवाजी सर,

     "प्रश्न", या प्रस्तुत कवितेतून आपण, जीवनाचे वास्तव समोर आणले आहे. आपल्या आयुष्यात उद्भवणाऱ्या प्रश्नांची मालिका हि एव्हढी मोठी असते, की त्याची उत्तरे मिळवण्यास मनुष्यास आपले अख्खे आयुष्य घालवावे लागते, पण इतका आटा-पीटा करूनही, त्याला काही सर्व प्रश्नांची उत्तरे काही मिळत नाहीत.त्यातील बरेचसे प्रश्न हे अनुत्तरित रहातात.

     तरीही, कोणत्याही परिस्थितीला मनुष्याला सामोरे जाणे भागच पडते.

     ? ? आणि अनेक ?

     प्रश्न असे अवघड की उत्तरच नसावे
     मग जीवनाचे गणित कसे सुटावे ?
     जीवनाची बेरीज वजाबाकी सोडाच,
     भागाकार करता करता नाकी नऊ यावे.

     आज एक सुटला, तरी उद्या नवीन उद्भवतो
     मनुष्यास एक नवीन आव्हान तो देतो
     पणास सारा कस लागतो मनुष्याचा
     शोध घेतो, वेध घेतो मग उत्तरांचा.

     आयुष्य सरले तरी प्रश्न मागे उरतात
     एका-पाठोपाठ एक हयात-भर छळतात
     प्रश्नांस मागे ठेवून माणूसच संपतो,
     आयुष्यभर तो उत्तरेच शोधत राहातो.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.07.2021-गुरुवार.