"सरत्या सायंकाळचे शापित जगणे ( वृद्धत्त्व )"

Started by Atul Kaviraje, July 01, 2021, 02:07:09 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     या चारोळी वृक्षावरली अजून काही पुष्पे सादर करतो . बाल्य, तारुण्य, वृद्ध या तीनही अवस्थांतून सर्वांनाच जावे लागते, काळ कोणासाठी थांबत नाही, बाल्य सरसर सरते, तारुण्य भरभर हरवते, आणी उरते ती जीवनाची संध्याकाळ, सकाळ, दुपार, आणि सायंकाळ अशी  ही चक्रे एका मागोमाग येत असतात, त्यात कधीही खंड पडत नाही, या जीवनाच्या अंतिम टप्प्यावर सारं   काही मागे सुटलेले असते, सारं  सारं हरवलेलं असत, अगदी कुणीही उरलेलं नसत, अन अस एकाकी आयुष्य कंठत असता असता तो शेवटला परतीचा अखंड प्रवास सुरु होतो. हा प्रवास फक्त एकट्याचाच आणि एकट्याचाच असतो, तेव्हा सोबत कुणीही नसते.

ऐकुया तर मन उदास करणाऱ्या  या  जीवनाच्या सायंकाळच्या काही उदास रचना----------------------

                 
                 चारोळीचे शीर्षक

======================
सरत्या सायंकाळचे शापित जगणे ( वृद्धत्त्व )
======================

( १ )
एक आवंढा, अन दीर्घ उसासा
भूतकाळात स्वतःस विसरून जाणे
त्या आठवणीच्या आशेवरच उरलंय,
सरत्या सायंकाळचे शापित जगणे.

( २ )
तो आठवणींचा पटल विरून गेलाय
केव्हाच गेलंय जहाज-जीवनाचे धुक्यात
उरलंय फक्त निष्प्राण कलेवर,
पल्ल्याड च्या प्रवासाची वाट पहात.

( ३ )
हे जगणे आता कोणासाठी
मरण मागूनही मिळत नाही
कृत-कर्माच्या अक्राळ-विक्राळ सावल्या,
आजही माझी-पाठ सोडत नाहीत.

( ४ )
प्रवास होता लांबचा जरी
सहवास होता आपल्यांचा आजवरी
काळाच्या ओघातून नाही कुणी निसटलय,
सारं सारं काही मार्गात हरवलंय.


     तर मित्रानो, हे आहे वृद्धत्त्व आणि जगणे.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.07.2021-गुरुवार.