विनोदी कविता - " लोकलमध्ये बॉम्ब, नुसतीच बोंबा-बोंब "

Started by Atul Kaviraje, July 02, 2021, 12:43:25 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     बऱ्याच वर्षांपूर्वी, मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये काही दहशत-वाद्यानी, बॉम्ब ठेवून, नागरिकांमध्ये घबराट पसरवली होती. काही ठिकाणी हे खरंच घडलं होत, तर याच्या अफवाही काही लोक पसरवत होते. नक्की काय त्याचा नीट शोध लावला गेला नव्हता, पण सरकारने त्यापुढे, लोकल ट्रेन बाबत योग्य ती काळजी घेतली होती.

     पण तेव्हापासून, जरासं देखील  काही खाट-खूट झालं, किंवा, एखादी बेवारशी बॅग किंवा पिशवी, कुणा ट्रेन मध्ये  सापडली तर, बॉम्ब ठेवल्याची अफवा त्वरित उठत होती. जनता शंकाकुल, भयाकूल झाली होती. ट्रेन ने प्रवास करण्यास घाबरत होती. नंतर या अफवा कमी होत जाऊन, जनतेच्या मनातले भय बरंचसं कमी झालं होत.

     माझी प्रस्तुत कविता, ही उपरोक्त विषयाला अनुसरून आहे. त्यावर काही विनोदी लिहावं, असं वाटलं, ऐकुया तर माझी विनोदाची झाक असलेली पुढील कविता- कवितेचे शीर्षक आहे- " लोकलमध्ये बॉम्ब, नुसतीच बोंबा-बोंब "


                      विनोदी कविता
        " लोकलमध्ये बॉम्ब, नुसतीच बोंबा-बोंब "
        -----------------------------------

बॉम्बचे प्रस्थ वाढलेय इतके
जळी-स्थळी लागलेत दिसू, बॉम्बचेच खोके
पोलिसांनी काढलेत पिंजून, नाकेच्या नाके,
वार्तांनी भणभणून, गेलंय नुसते डोके.

     अफवांचे पीक वाढू लागलंय आतासे
     घोषणा निवेदिकेची, "यात्रा मत करो इस लोकलसे"
     डब्यात लोकलच्या,डबे आढळले छोटेसे,
     पहाणी करताच सापडले, गुलाब-जाम अन बत्तासे.

जरासे कुठे झाले खाट-खूट
उडी टाकून पळतात यात्री बेछूट
टीसी मळू लागलेत हाताने तंबाखू-चुना,
विना-तिकीट प्रवासी मिळत नाही त्यांना.

     बॉम्बची बोंबा-बोंब,अफवांना फुटलेत कोंब
     प्राण-भयाने होतोय जीवाचा आग-डोंब
     मुंबईत तरीही वाढताहेत लोंढे,
     जय-हो-मुंबई, माझ्या जीवाची मुंबई. 


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.07.2021-शुक्रवार.