‘अरे, ते माझे आहे.

Started by Swan, March 16, 2010, 01:43:50 PM

Previous topic - Next topic

Swan

भुसावळ- स्टेशनवर, सिग्नल मिळत नसल्यामुळे, रेल्वे खूप वेळ थांबली होती. पॅसेंजर वाट पाहून कंटाळले होते. तेवढय़ात गाडीतला एक पंधरा, सोळा वर्षांच्या दरम्यान असलेला एक तरुण त्या डब्यात फिरत म्हणाला, 'हे पारकर पेन कुणाचे पडले आहे?' एकजण म्हणाला, 'अरे, ते माझे आहे, मी दोन दिवसांपूर्वीच विकत घेतले होते. तेवढय़ात खिडकीजवळ बसलेला एकजण म्हणाला, 'अरे, ते माझे आहे, माझ्या मामांनी गेल्या आठवडय़ात वाढदिवसाचे प्रेझेंट दिले आहे. हँडल धरून उभा असलेला एक तरुण आपले खिसे चाचपडत म्हणाला, 'अरे, ते माझे आहे.' माझ्या बहिणीने मला वापरायला दिले आहे.'
शेवटी तो तरुण हसत हसत म्हणाला, 'वारे खोटे मंडळी, कमाल आहे तुमची! या पेनचा मालक मीच आहे. बारावीच्या परीक्षेसाठी, माझ्या वडिलांनी मला आणून दिले आहे. ट्रेन खूप वेळ थांबली आहे, म्हणून जरा गंमत केली.'