चारोळी-लेख - "झुंज मराठी"

Started by Atul Kaviraje, July 03, 2021, 12:17:39 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                         चारोळी-लेख
                         -----------

चारोळीचे शीर्षक

=================
"झुंज मराठी"
=================

तळपदेंच्या श्रेयसने लढवलीय शक्कल
महाराष्ट्र झुंजीचा उचललाय विडा
शहरी सेलिब्रेटी मराठ्यांना म्हणतोय,
हाती गाव-नांगर धरा, नाहीतर रडा
====================


     काहीतरी सनसनाटी हवे, काहीतरी नवीन हवे, मराठी माणसाने कुठेतरी, केव्हातरी, कधीतरी पुढे यावयास हवे, काहीतरी करून दाखवावे, मागे राहू नये, म्हणून श्रेयसदाने आपल्या डाय़रेक्शन खाली एक अति उत्तम मराठी सिरीयल काढली होती - "झुंज मराठी". शहरातील मराठी सेलीब्रेटीना शहरातून बाहेर काढून आणी गावामध्ये, गावच्या मातीमध्ये खेचून अशी काही झुंज त्यांच्यांकडून करून घेतली होती ,कि यंव रे यंव. आरामात जीवन जगणाऱ्या , ऐषो  आरामात जीवन ढकलणाऱ्या या शहरी कलाकाराना त्याने गाव म्हणजे काय चीज आहे, मेहनत म्हणजे काय आहे, हे खरेपणाने दाखवून दिले होते .

     शरीराने सुखी असलेल्या या कलाकाराना त्याने जणू सड - पातळ करण्याचा विडाच उचलला होता , व आता त्याने हि झुंज आपल्या शकलीने फिनाले पर्यंत आणली होती , बक्षीस मिळो ना मिळो हि बात वेगळी, पण खेड्यातले जीवन त्याने त्याना आणि पर्यायाने ही मालिका पाहणाऱ्याना  चांगल्या रीतीने दाखविले होते .   

     कीप ईट अप, श्रेयस, असेच तुझे हे कार्य चालू ठेव, आणि हो, या मराठी झुंजीचे अनेक भाग ही येऊ देत, हि कळकळीची तुजपाशी विनंती.


     श्रेयस, तुझे एक अनोखी सिरीयल सादर केल्याबद्दल खूप खूप आभार.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2021-शनिवार.