जीवन - वास्तव कविता - "रंगमंच जीवनाचा, जणू सारीपाट"

Started by Atul Kaviraje, July 06, 2021, 12:09:38 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     जीवनाची आणि एक व्याख्या म्हणजे रंगमंच आणि सारीपाट . हे  दोन शब्द मी मुद्दामूनच वापरलेत कारण माझ्या  प्रस्तुत कवितेत  या दोन्ही शब्दांचा प्रामुख्याने अंतर्भाव आहे. थोडक्यात, या विषयावरच माझी हि कविता आहे.

     रंगमंचावर ज्याप्रमाणे आपल्या अभिनयाने , एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला शह देत असतो, ज्याचा अभिनय निखालस तोच वरचढ असतो. जो टिकतो, तोच बाजी मारतो. तद्वतच, बुद्धिबळाच्या पटावर एकमेकांच्या विरुद्ध खेळणारे प्रतिस्पर्धी, आपल्या खेळातील कौश्यल्याने, एक - दुसऱ्यावर मात करीत असतात. तसंच, जीवना-बाबतीतही आहे. जीवन जगण्यास जी अहमहमिका, ओढ , स्पर्धा मनुष्यप्राण्यांत लागली आहे, त्यात तो कधी दुसऱ्यांस शह देतो , तर कधी त्याला मात स्वीकारावी लागते.

     ऐकुया तर, जीवनाची ही खरीखुरी कहाणी, सद्य स्थितीवर ज्वलंत आशय असलेली, कवितारूपे. कवितेचे शीर्षक आहे - "रंगमंच जीवनाचा, जणू सारीपाट

                   जीवन - वास्तव कविता

==================
"रंगमंच जीवनाचा, जणू सारीपाट"
==================

रंगमंच जीवनाचा, जणू सारीपाट
वरचष्मा एकाचा, दुसरा भुई-सपाट
येथे होते एकाची दुसऱ्यावर मात,
अंती बळाचाच, विजयाचा थाट.

स्वार्थांध दुनिया, मत्तांध सत्ता
येथे कटतोय एकमेकांचाच पत्ता
व्यर्थ चढाओढ, नावारूपा येण्याची,
अहमहमिका, हीच - का जीवन जगण्याची ?

नाही माणसाला येथे-काही स्थान
नाही माणुसकीला येथे-काही मान
स्पर्धा खेळणारी, प्रवृत्ती आसुरी,
सारा सारीपाट, जीवनाचा उधळवणारी.

अनभिषिक्त सम्राट या रंग-मंचावरला
अजिंक्य राजा बुद्धी पटा-वरला
नच कळेना या - मूढ मानवाला,
डाव क्षणाचाच येथे रंगलेला.

    मित्रानो, आहे ना वास्तव - वादी चित्र आजचे.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.07.2021-मंगळवार.