नवल कविता - "आमची द्राक्षे खा, आंदोलनात सहभागी व्हा!"

Started by Atul Kaviraje, July 06, 2021, 11:24:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     गेल्या सव्वा वर्षांच्या काळात, कोरोनाने आपल्याकडून बरंच काही हिरावून घेतले आहे. काहींच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे धंदे ठप्प झाले, गावी फळबागांचे खूप नुकसान झाले, शेतीचे, पिकांचे नुकसान झाले. कारण त्यांना कोरोनच्या लौकडाउन मुळे मार्केटचं उपलब्ध नव्हते. या काळात आलेल्या आर्थिक मंदीमुळे, सर्वार्थाने देशाचे आत्यंतिक नुकसान झाले. याची झळ देशातील प्रत्येकालाच बसली. प्रत्येक व्यक्ती  आज कोरोनाच्या याच सावटाखाली जगत आहे. तो आज नीट जगू शकत नाही. रात्री शांतपणे झोपूही शकत नाही.

          एक बातमी मागे, ऐकण्यात आली, कि काही आंदोलनकऱ्यानी चक्क द्राक्षे वाटून आंदोलन केले होते.यापाठी त्यांचा खरा उद्देश कळत नव्हता. पण हि बातमी मात्र नक्कीच खरी होती. मनात विचार आला कि, कोरोनाच्या असलेल्या लौकडाउन मुळे या द्राक्षे पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना कदाचित मार्केट मिळत नसावे. सर्वत्र बंद असल्यामुळे, मार्केट ही बंद असल्यामुळे द्राक्षांचा योग्य तो खप होत नसेल . त्यांना योग्य तो बाजार भाव मिळत नसेल, म्हणून ती तशीच शेतात पडून असतील. त्यामुळेच त्या आंदोलनकारी शेतकऱ्यांनी द्राक्ष वाटपाचे हे उचललेले अनोखे पाऊल असेल, असे मला वाटत होते.

          माझी प्रस्तुत कविता ही अशीच या विषयावर आहे. विषय आहे-  द्राक्षे वाटून अनोखे आंदोलन. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, असलेल्या सावटावर, मी ही कविता करून थोडासा आलेला ताण दूर करण्याचा लहानसा प्रयत्न केला आहे. ऐकुया तर साधी सोपी, थोडीशी विनोदाची झाक असलेली, शेतकऱ्यांच्या वास्तविक जीवनावरील खरी खुरी नवल कविता . कवितेचे शीर्षक आहे-"आमची द्राक्षे खा, आंदोलनात सहभागी व्हा!"



                                          नवल कविता
                                 द्राक्षे वाटून अनोखे आंदोलन
                           "आमची द्राक्षे खा, आंदोलनात सहभागी व्हा!"
                  --------------------------------------------------


फळे घ्या, फळे खा
द्राक्षे घ्या, द्राक्षे खा
रस्त्यामधून चालला होता मोर्चा,
सूर लागला होता साऱ्यांचा वरचा.

पहातो तर कित्येक आंदोलनकारी
ललकारत होते बारी-बारी
नाऱ्याबरोबरच ते वाटत होते,
हिरवी, पिवळी द्राक्षे नवी-कोरी.

प्रश्न पडला चाललेय काय ?
या द्राक्षांचे करायचे काय ?
प्रमुख म्हणाले, आंदोलन आहे,
यासाठी, द्राक्षे वाटतो आहे !

मी म्हणालो, यात नवीन काय ?
हा कोणता आंदोलनाचा उपाय ?
ते म्हणाले, हीच अनोखी रीत,
पहा आमची द्राक्षांवरली प्रीत.

आंदोलन तुम्ही का करताय ?
यातून तुम्ही काय साधताय ?
ते म्हणाले, काहीतरी नावीन्य,
आंदोलनाचा मार्ग नाही अन्य.

गावी आहेत आमचे द्राक्षाचे मळे
इतरही झाडांवर लगडलीत फळे
आता नाहीय, द्राक्षांना मिळत बाजार,
सुकलीत वेलींवर,त्यांना लागलाय आजार.

महामारीच्या कोरोनामुळे आहे लौकडाउन
बंद झालीत मार्केटे अन गोडाउन
दुजा काही मार्ग नाही सुचत,
म्हणून आम्ही सुटलोय द्राक्षे वाटत.

वाया जाण्यापेक्षा मुखी लागतील
अनेकांचे आम्हा आशीर्वाद मिळतील
खूप मेहनत मळे पिकविण्यासाठी,
अथक मशागत असते त्या-पाठी.

कोरोनाने आमच्यावर आणली बंदी
मुकाट सहतोय नुकसान आणि मंदी
गुरा-ढोराना टाकण्यापेक्षा माणसांनी खावी,
गोड द्राक्षांची आमच्या चव चाखावी.

त्यांचा उद्द्येश लक्षात आला होता
समाधानाने त्यांचा चेहरा खुलला होता
या अनोख्या आंदोलनातून त्यांनी,
सर्वांचा दुवा साधला होता.

मनातील उदासीनता लपवीत होते
नुकसान सहुनही ते खूष होते
अभिनव आंदोलनाचा मार्ग पत्करून,
सर्वांचेच तोंड गोड करत होते.

आंदोलन तर नुसते नावाला होते
कोरोनाने बरंच काही शिकवले होते
जाती-पातीचे बंधन तोडून त्याने,
सर्वाना एकत्र बांधले होते.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.07.2021-मंगळवार.