"केलीस तू पखरण गुलाबी "

Started by Atul Kaviraje, July 07, 2021, 12:50:29 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

    मला  एके  रात्री  एक  गुलाबी  स्वप्न  पडले.  गुलाबी  म्हणजे  तसलं  काही  नव्हे  बर  का. तर  माझ्या  स्वप्नात  एक  गुलाब -परी  आली  होती. म्हणजे  गुलाबी  रंगाची  परी , जी  गुलाबी  रंगाची  मुक्त  उधळण  करीत  होती.  फार  काही  प्रस्तावना  न  देता  ऐकुया  तर  मला  या  स्वप्नातच   स्फुरलेले  त्या  गुलाब -परीचे अतर्क्य  काव्य -चित्रण. कवितेचे  शीर्षक  आहे - "केलीस तू  पखरण  गुलाबी "

               "केलीस तू  पखरण  गुलाबी "
               -------------------------
                         
स्वप्नातल्या रंगात गुलाबी, रंगलोय मी
प्रेम-रंगात गुलाबी, नाहालोय मी
माझ्या स्वप्नातली परी-राणीच तू प्रिये,
तुझ्या गुलाबी चित्रात दंगलोय मी.

गुलाबी रंग आज मुक्त उधळलाय
सुगंध तयाचा सर्वत्र दरवळ लाय
या रंगाची मलाइका तू सुंदरी,
तुझ्या अंगो पांगांतून तो डोकावलाय.

अधर गुलाबी, तुझ  हास्य गुलाबी
तुझे  पाहणे गुलाबी, तुझी नजर गुलाबी
गुलाबी सौदर्याची राज्ञी तू,
गुलाबी रंगाची सम्राज्ञी तू.

अवखळ डोकावणे तुझे  गुलाबी
खट्याळ पहाणे तुझे गुलाबी
उधळण गुलाबी, पखरण गुलाबी,
तुला पाहून माझे मन झाले गुलाबी.

अवचित जागलोय या गुलाबी स्वप्नातून
वास्तवात आलोय या गुलाबी भानातून
पण एक मात्र आक्रीत घडलंय,
सर जग मला गुलाबी भासू लागलयं.

सत्यात उतरता या गुलाबी भावनांतून
टेबलावरील फुलदाणीकडे सहज लक्ष्य गेलंय
ते सत्य होत कि स्वप्न,तो भास होता कि वास्तव?
फुलदाणीतल्या गुलाबांकडे पहाता राहून राहून वाटू लागलयं.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.07.2021-बुधवार.