तडका - वकील

Started by vishal maske, July 07, 2021, 07:38:16 PM

Previous topic - Next topic

vishal maske

वकील

छोटा असतो, मोठा असतो
मध्यम आणि हूशार असतो
प्रत्येक स्तरात असला तरी
वकील कधी लाचार नसतो

भल्या मोठ्या संकटांतुनही
वकील सहज सहज तारतो
म्हणूनच तर संकटकाळी
वकील प्रत्येकालाच स्मरतो

कुणासाठी असतो दिशादर्शक
कुणासाठी मात्र खंजर असतो
जगणे ही हैराण करू शकतो
कारण वकील पण डेंजर असतो

ॲड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड
मो. ९७३०५७३७८३