नवल-कविता-"जन्म लावलास तू सत्कारणी, अजूनही देशी मृत्यूस हुलकावणी"

Started by Atul Kaviraje, July 07, 2021, 11:24:48 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजून एक कविता, पण तीही नवल-पूर्ण. कोरोनाचा कहर सर्व जगभर झालाय. सर्व जगास त्याने गिळंकृत केले आहे. अगदी कोणीही या पँडेमिक मधून सुटलेले नाही. सर्वानाच या रोगाची कमी जास्त प्रमाणात लागण झाली आहे. पण यातही एक नवल मात्र घडलेय. परदेशातील एक व्यक्ती या रोगास बळी पडली होती. त्याआधी मी तुम्हाला एक गणिती समीकरण सांगतो  . 

     ( ३००+८०+४०+१०) याचाच अर्थ, त्या परदेशातील ८० वर्षे वयाच्या वृद्धाला सलग ३०० दिवस कोरोनाची लागण होऊन, त्याची कोरोनाची केलेली चाचणी हि तब्बल ४० वेळा (+)VE आली  होती, व त्या व्यक्तीस एकूण १० वेळा इस्पितळात दाखल करण्यात आले होते. आहे कि नाही नवल. इतके असूनही ती व्यक्ती, आजही कोरोनाग्रस्त आहे. काही चमत्कार झाल्याप्रमाणे आजही जिवंत आहे, व प्रत्यक्ष मृत्यूलाही हुलकावणी  देत आहे.

     ही बातमी मी जेव्हा ऐकली तेव्हा माझा प्रथम विश्वास बसला नाही. कारण इतके दिवस कोरोनाचे घातक जिवाणू शरीरात घेऊन कोणीही जिवंत राहू शकत नव्हते, पण या व्यक्तीने सारे अंदाज फोल ठरवून साऱ्या जगाला चकीतच केले आहे. आजही तो  कोरोनाशी लढत आहे इस्पितळात दाखल होऊन ठीकही होतोय आणि बाहेरचे सुंदर जगही पुन्हा पहातोय. ऐकुया तर ही आणि एक नवल कविता. कवितेचे शीर्षक आहे - "जन्म लावलास तू सत्कारणी, अजूनही देशी मृत्यूस हुलकावणी"


                                नवल-कविता
      "जन्म लावलास तू सत्कारणी, अजूनही देशी मृत्यूस हुलकावणी"
     -------------------------------------------------------


कोरोनाने ग्रासित देश पूर्ण 
महा-विळख्यात अडकलेत लोक संपूर्ण
काहींना जीवनदान, तर काहींचे मृत्युगान,
स्वप्ने राहिलीत सर्वांचीच अपूर्ण.

महामारीतून नाही कुणी सुटले
रथी-महारथी असले जरी भले-भले
एका अदृश्य मारक शक्तीने,
सुदृढ शरीरा हतबल केले.

सर्व-सर्व व्यवहार ठप्प झाले
नोकरीच्या साऱ्यांचे पंचनामे झाले
हातावर पोट असलेले गरीब,
दोन वेळच्या अन्नास मोताद झाले.

परदेशी व्यक्तीचे एक नवल ऐका
त्याची जगण्याची जिद्द तरी पहा
त्यापुढे कोरोनाही झालाय अति-क्षुद्र,
लोकांच्या नजरेत व्यक्ती ठरलीय महा.

सलग ३०० दिवस आहे कोरोनाग्रस्त
जीवनाचा सांगता येत नाही अस्त
तरीही मनाने अजूनही घेतोय उभारी,
जगण्याची जिद्द आहे अति भारी.

कोरोनाने व्यापिले साऱ्या शरीरास
जर्जर केले देहाच्या अंतर्भागास
कोरोना चाचण्या झाल्या ४० वेळा,
(+) VE आल्या त्या प्रत्येक वेळा.

इस्पितळात दाखल केले १० वेळा
उपचार होत होते कित्येक काळा
पण हार नाही त्याने मानली,
डॉक्टरांनी सारी शर्थ पणा लावली.

औषधोपचार आतला त्यास (-)VE करायचा
बाहेरचा कोरोना त्यास (+)VE करायचा
असे अनेक वेळा घडले,
पण मृत्यूचे कुठंतरी गणितच चुकले.

आत्मबळाने जगण्याच्या उमेदीने तो
देत होता मात प्रत्यक्ष मृत्यूसही
दराबाहेरील यम-दूतास प्रवेश नव्हता आत,
विवश होऊन तो नुसता पाहातच राही.

नवल कहाणी ऐकून मती गुंग झाली
जगण्याच्या जिद्दीने मरणावर मात केली
अजूनही देतोय तो मृत्यूस हुलकावणी,
जरी वयाची ८० वर्षे  त्याची उलटली.

या वयातही अशी पाहून जिद्द
चकित मन विचार करू लागते
नियतीसही बदलणाऱ्या या जिद्दीपुढे,
नकळत आदराने मान झुकते.

आजही ग्रासलाय  तो या आजाराने
मात करतोय पुन्हा पुन्हा मनः शक्ती, मनः सामर्थ्याने
हातावरच्या रेषाही झाल्यात आज पुसट,
जिद्दीस त्याच्या नमतय कोणतंही संकट.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.07.2021-बुधवार.