चारोळी-लेख - "वाट (पावसाची )"

Started by Atul Kaviraje, July 09, 2021, 01:22:08 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             चारोळी-लेख
                             -----------

चारोळीचे शीर्षक

=============
"वाट (पावसाची )"
=============

रख-रखते उन तप्त-तव्यासम सहतोय
घर्म-धारा पावलांगणिक तनु नहातोय
मनी हरित-तृप्त-शीतल, तृण चक्षु-तोय,
टप-टप-टप (जलद) जलद दे रे, ये रे, ये रे,
ये रे,आतुर नयनी तुझी वाट पहातोय.
======================


    तर हि चारोळी मी ,जेव्हा पावसाने  अगदीच दडी मारली होती, त्या म्हणजे सुरुवातीच्या जून महिन्यात पाउस बिलकुलच नव्हता, सारेजण त्याची आतुरतेने वाट पहात होते, त्यावेळेची.

     शेवटी निसर्ग हा महान आहे, आणि आपण माणस  त्याच्यापुढे लहान आहोत. पावसाचे येणे, त्याचे पडणे, हे त्याच्या त्या त्या ऋतूवर अवलंबून असते, पण हा त्याचा पडण्याचा ऋतू हि त्याने क्रॉस केला.  एक दिवस, दोन दिवस, चार दिवस असे म्हणता म्हणतां तब्बल महिना होऊन गेला तरी याची पडण्याची काहीही चिन्हे दिसेनात, झाले इथे भूवर सगळीकडे हाहाकार माजला. साऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले, जो तो हवालदिल झाला, पाउस नाही तर पाणी नाही, पाणी नाही तर जीवन नाही, आणि जीवन नाही तर पुढे काय ? याचा विचारच करवेना.

     आणी अश्या परिस्तिथीतच  मला चालता चालता वरील चारोळी सुचली. खाली जमीन तापलेली आणि वर डोक्यावर सूर्य तापलेला अशा या वातावरणात मी चालत होतो, हि जमीन सूर्याच्या उष्णतेमुळे इतकी तप्त झाली होती, इतकी तापली होती कि, मला असे वाटत होते, कुणीतरी मला गरम कढइत ढकलले आहे, व मस्तपैकी भाजून काढत आहे, पायाना, सर्व शरीराला, सर्वांगाला चटके बसत होते, शरीराचे तापमान इतके वाढले होते, कि, हळू हळू माझा शरीराला घाम येऊ लागला माझे सर्व शरीर घर्म धारांत न्हाऊन गेले, ज्या महिन्यात पावसाने आपल्या प्रेम-वर्षावाने प्रेमाने न्हाऊ घालायचे , त्या महिन्यात मी घर्म-धारांनी न्हाऊन निघालो होतो, प्रत्येक पावलागणिक सर्व घाम माझे पाउल भिजवत होता, माझी शक्ती ताकद कमी करत होता.

    त्या कमजोरीमुळे डोळ्यांपुढे जणु काही अंधारीच येऊ लागली होती, आणी असे चालता चालता मी एक सुखद असे स्वप्न पाहू लागलो होतो, या स्वप्नात मी पहात  होतो होतो कि पाउस आला आहे, सतत पडत आहे, सगळीकडे सुखद गारवा,ओलावा पसरलेला आहे, सगळीकडे हिरवळ कशी डोलते आहे, श्रुष्टीला नव्हाळी आली आहे, नदी नाले समुद्र भरून वाहताहेत, सर्व कसे हिरवेगार झाले आहे, मनाच्या डोळ्यांनी मी हे हिरवेपण पहात आहे, माझ्या डोळ्यांत साठवून ठेवत आहे तृप्त होत आहे, माझे मनही तृप्त होत आहे, त्याची तहान हि या  पावसाला  पाहून भागली आहे, पण इतक्यात मला ठेच लागली , व मी पुन्हा भानावर आलो , म्हणजे आता पाहिले ते मला एका मृग - जलासम भासू लागले होते .

     मित्रहो, तर अशी हि पाळी प्रत्येकावर आली तर विचारच करवत नाही यापुढे आपले काय होईल ? तर असे हे चित्र पुन्हा दिसू नये, म्हणून आपण सर्वांनी त्या ढगाला  साकडे घालूया त्याची मनापासून प्रार्थना करूया, त्याची विनवणी करूया, हे ( जलद - म्हणजे जल, पाणी देणारे ) ढगा, कृपया आमच्या हाकेला धाव, ज्याची आम्ही इतकी आतुरतेने वाट पाहतोय, त्याचे एकवार दर्शन आम्हाला दे, आम्हाला पाणी दे, आम्हाला पाउस दे, आम्हाला अमृत दे, आम्हाला जीवन दे, जितक्या लवकर शक्य तितक्या जलद दे, लवकर दे, कारण आता हे उन, हा उन्हाळा सहन करणे आमच्या शक्तीबाहेरचे  आहे, तेव्हा तू त्या पावसाला लवकरात लवकर आमच्याकडे म्हणजे ,भूवर पाठवून दे, त्याला पहाण्यासाठी आमचे डोळे नयन आतुर झाले आहेत व त्याची टप टप ऐकण्यासाठी आमचे कानही आतुर झाले आहेत.

     तेव्हा आमच्या सहन-शक्तीचा  अंत पाहू नकोस व आमच्यावर दया कर, आम्ही तुझे जन्मभर ऋणी राहू. शेवटी पाउस पडलाच , पण आम्ही, आपण सर्वांनी या एका महिन्यात पावसाविना जे भोगले असे कधीही घडू नये,असे मला वाटते, एक धडा मला, आपल्याला, सर्वाना यातून नक्कीच शिकण्यास मिळाला ,असेही मला वाटते.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.07.2021-शुक्रवार.