स्वयं-सिद्धा स्त्री-कविता-"मुली शाळकरी, बसने मोफत प्रवास करी"

Started by Atul Kaviraje, July 11, 2021, 12:16:45 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     सरकारने एक स्तुत्य उपक्रम गरीब व पर्यायाने सर्वच शाळकरी मुलींसाठी सुरु केला आहे, तो म्हणजे या मुलींना मोफत बसचा प्रवास, काही दिवसांपूर्वीच ही बातमी वाचण्यात आली होती. समाज घडविणारी, कुटुंब घडविणारी कर्ती स्त्री ही या मुलींचे भविष्यच आहेत, या दृष्टिकोनातून त्यांना योग्य त्या सवलती मिळाव्यात, त्यांची परवड होऊ नये. त्यांचे भविष्य सुकर व्हावे यासाठीच सरकारने हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे, जो कि अतिशय स्तुत्य आहे. 

          हे विद्यार्थी, विद्यार्थिनी उदयाचा समाज घडविणार आहेत, एक चांगले सुजाण नागरिक होणार आहेत, याचा मूळ पाया, म्हणजे शाळा. आणि म्हणूनच त्यांचा हा पाया भक्कम होण्यासाठी सरकारने ही त्यांना योग्य ती सवलत दिली आहे. कदाचित उद्या सरकार शाळकरी मुलींना शिक्षणही मोफत मिळावे, यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहील, यात शंकाच नाही.

     जबाबदारीचे हे एक सरकारचे वर्तन आहे, यासाठी सरकाराचे अभिनंदन, असे आणखीन  शाळा आणि महाविद्यालय - भिमुख सवलती, योजना सुरु व्ह्याव्यात जेणेकरून मुलांचा अभ्यास सुकर होऊन ते पुढे यावेत, असे माझे प्रामाणिक मत आहे. ऐकुया तर ही अनोखी कविता. कवितेचे शीर्षक आहे - "मुली शाळकरी, बसने मोफत प्रवास करी"

     


               शाळकरी मुलींना बसने मोफत प्रवास
                    स्वयं-सिद्धा स्त्री-कविता

          "मुली शाळकरी, बसने मोफत प्रवास करी"
         --------------------------------------

आजची मुलगी, स्त्री उद्याची
निः संशय, काळजी वहाते  कुटुंबाची
घरी स्त्री नाही, तर ते घर नाही,
नातं कुणाचे मग कुणाशी राही ?

स्त्री जोडते अख्खे कुटुंब एकत्र
स्त्री सांधते दुवा नात्याचा एकमात्र
चार भिंतींचे घर, नुसते छ्प्परच असते ?
त्यात ममता-माया भरणारी फक्त स्त्रीच असते !

लहानपणीचे बाळकडू उपयुक्त मोठेपणी
आदर्श आई-वडिलांचा मग लागे सत्कारणी
सर्व संस्कार असतो  मिळून माहेरचा,
आणखी एक दुवा सांधतात, माहेर-संसाराचा.

मुलगी झाली, संकटे आली
मुलगी जन्मली, फुका गेली
तेव्हाची झापडे आज निघालीत डोळ्यांवरची.
अज्ञानाची कवाडे उघडलीत आज मनावरची.

आज सर्वतोपरी घेताहेत शिक्षण मुलांबरोबर
खेळातही असतो पुढाकार त्यांचा पुरुषांबरोबर
आज मुलगी झाली, घर प्रकाशले,
आता मुलगी झाली, तिमिर निमाले.

नाही बला,नाही अबला, ती तर सबला
तयार असते निर्भय करण्यास केव्हाही मुकाबला
कमजोर नाही, दुर्बल नाही, नाजूकही नाही,
समाजात वावरताहेत अश्या कित्येक निर्भयाही.

सरकारचे कौतुक करावे तितके थोडे
नवं-नियमाचे घालून दिलेत कित्येक धडे
शाळा हा पाया,विद्यार्थी घडविण्याचा, घडण्याचा,
मुलींनाही दिला जातोय दर्जा प्राथमिकतेचा.

सरकार वहातंय काळजी गरीब मुला-मुलींची
मोफत सोय करून त्यांच्या शाळा-प्रवासाची
नजराणा देऊन शाळकरी मुलींना, खास सवलतींचा,
प्रवास त्यांचा केलाय सुकर, बिन-पैश्यांचा.

मिळावा आधार मुलींना, घडावे त्यांचे जीवन
धोरण आखलंय सरकारने, उद्दिष्ट्य ठेवून नजरेसमोर
व्हावी प्रगती मुलींची, मिळावे त्यांना अनुदान,
उद्याची कर्ती नारी, घडवल्याचे एक समाधान.

स्तुत्य उपक्रम राबविला जावा नेहमीचा
एक मार्ग मिळेल, या मुलींना पुढे येण्याचा
शिक्षणही मिळावे मुलींना यापुढे विना-पैश्यांचे,
जबाबदारीचे वर्तन दिसत आहे सरकारचे.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
----दिनांक-11.07.2021-रविवार.