अनुभवी जबाबदार चारोळ्या-"केसांत पांढरी बट दिसतेय,वृद्धत्त्वाची हळू-हळू जाणीव होत

Started by Atul Kaviraje, July 11, 2021, 02:42:09 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                     अनुभवी जबाबदार चारोळ्या
"केसांत पांढरी बट दिसतेय,वृद्धत्त्वाची हळू-हळू जाणीव होतेय!"- भाग-१
-------------------------------------------------------------


(१)
आरसा मला आतासा ओळखीनासा झालायं
कुचेष्टेने पाहून माझ्याकडे, हसू लागलाय
केसांतील पांढरी बट दाखवून मला म्हणतोय,
आज तू मला काहीसा वेगळाच भासतोय.

(२)
काहीतरी अघटित घटत होते
तारुण्याचे विश्व मला वाकुल्या दाखवीत होते
वृद्धत्त्वाच्या उंबरठ्यावर उभा होतो मी,
म्हातारपण माझ्या केसांतून डोकावत होते.

(३)
बायको म्हणाली, तुम्ही मला शोभत नाही आतासे
डोक्यातून केस डोकावताहेत तुमचे नकोसे
मला कुळकुळीत केसांचा नवरा पुन्हा हवा,
या पांढऱ्या बटेला (बयेला) तुम्ही कुठेतरी लपवा.

(४)
काल मुली मला वळून वळून पहात होत्या
पहाताना त्यांच्या भुवया उंचावत होत्या
आज त्यांच्या नजरेत उपहास डोकावत होता,
हा सारा त्या पांढऱ्या बटेचा खेळ होता.

(५)
कलप करायचा निर्धार केला होता
परि त्यास मन तयार होत नव्हते
"ठेविले अनंते तैसेचि राहावे", या उक्तीनुसार,
मी आता वागायचे ठरविले होते.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.07.2021-रविवार.