व्यंग विनोदी कविता-" कॅफे सायबरचे धंदे नाय बरे !"

Started by Atul Kaviraje, July 12, 2021, 01:13:40 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     गोष्ट तेव्हाची, जेव्हा घरोघरी कॉम्प्युटर नव्हते, इंटरनेट नव्हते, त्या वेळी कॅफे सायबर ही गणक-यंत्र संकल्पना नावारूपास आली होती, त्यांचा धंदा जोरात चालू झाला होता. मुलांना विविध अभ्यासक्रमांत मदत होऊन , व इतरही जागतिक माहिती त्यांना मिळावी, या उद्देशाने ही प्रायव्हेट केंद्रे सुरु करण्यात आली होती. भरघोस पैसे कमावून, या सायबरचे मालक गब्बर झाले होते.

     सांगायचं मुद्दा हा की या सायबर कॅफेत विद्यार्थी येऊन कॉम्प्युटर शिक्षण घेण्याच्या नावाखाली चक्क सेक्स साईट उघडून त्यात मसालेदार चित्रे किंवा स्लाईड किंवा मुव्हीज  पाहत होते. या गोष्टींचा पोलीस तपास होऊन, हे कॅफे सायबर धंदे कायमचे बंद होऊन, त्यांच्या मालकांना अँटी-सोशल  कार्यासाठी अटक करण्यात आली होती. तेव्हा ही बातमी खूप व्हायरल झाली होती.

     पश्चिमीकरणाची कास धरून, आपले विद्यार्थी त्यांच्याप्रमाणेच होऊ लागले होते. आपली संस्कृती कशी अधोगतीस चालली आहे, याचे ते एक उत्तम उदाहरण होते. अर्थात हे सर्व त्याकाळी घडून गेले होते, आता घरोघर कॉम्प्युटर आले आहेत, इंटरनेट लागले आहेत. घर-बसल्या विद्यार्थी जगभरच्या बातम्या क्षणार्धात  मिळवतो आहे. ऐकुया तर वरील विषयावर एक उपरोधिक, व्यंगात्मक, विनोदी कविता. कवितेचे शीर्षक आहे-
" कॅफे सायबरचे धंदे नाय बरे !"


                         व्यंग विनोदी कविता
                  " कॅफे सायबरचे धंदे नाय बरे !"
                ------------------------------- 


बोर्ड लावून वर "इन्स्टिट्यूट कॉम्प्युटर "
आत ट्युशन होते वेगळ्याच विषयांवर
अश्लील, चावट, बीभत्स संस्कृतीचे,
धडे देतेय कॅफे सायबर.

     सर्व भाषा देशोधडीला लावून
     विद्यार्थी शिकतोय वेगळीच भाषा
     उघडून "सेक्स" च्या साईट इंटरनेटवर,
     चटावतोय चित्रांना ,वाढतेय अभिलाषा.

घेण्यास  शिक्षण झालीय गर्दी
दिवसेंदिवस वाढताहेत यातील दर्दी
जागोजागी लावून कॅफेचे फलक,
गब्बर झालेत सायबर मालक.

     पश्चिमीकरणाचे मूळ धरू लागलयं
     आधुनिकीकरणाच्या नावाखाली फोफावू लागलयं
     पसरू लागलीय जणू विष-वल्लीच,
     करून संस्कृतीची थट्टेखोर पायमल्लीच.

वहात चाललीय कुठे संस्कृती ?
वहात चाललाय आजचा विद्यार्थी
जिथे संगणकाने चालना दिलीय प्रगतीस,
तिथे, आदिमानव होऊन चाललाय अधोगतीस.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.07.2021-सोमवार.