अंधश्रद्धा विनोदी कविता-" सिने-तारकांची प्रेमळ दृष्टी घालवी, मंगळाची वक्र-दृष्टी

Started by Atul Kaviraje, July 13, 2021, 12:31:21 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     ही कथा ही बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. बातमी अशी होती की, तेव्हा एका विज्ञान चमत्काराने मंगळ आणि पृथ्वीची युती झाली होती. बऱ्याच वर्षांतून असा योग केव्हातरी येतो. ते एक सायन्स मिरॅकल असते. पण या माणसाची कुबुद्धी कुठे कुठे धावते पहा. याचा फायदा त्यावेळच्या कुडबुड्या ज्योतिषांनी घेतला होता. ही मंगळ - धरेची युती म्हणजे पृथ्वीवर येऊ घातलेलं भविष्यातील एका संकटाची नांदीच आहे, याचा त्यांनी खूपच गवगवा केला होता. मंगळाची वक्र दृष्टी पृथ्वीवर पडून काहीतरी अमंगल घडणार आहे, असे ते त्यावेळी ठासून प्रतिपादित करीत होते.

     जनांतील अंधश्रद्देचा गैर-फायदा घेऊन, हे अनिष्ट संकट टाळण्यासाठी ते त्यांना उपायही सुचवीत होते. त्यांना अक्षरशः लुटून पैसे जमा करीत होते. हा उपाय म्हणजे, जर का तुमच्यावर सिनेमातील नट आणि नट्यांची प्रेमळ, सुहृद दृष्टी पडेल, तर तुम्ही या संकटांतून सहज तरून जाल, तुमच्यावर मंगळ ग्रह वक्र-दृष्टी ठेवणार नाही.ऐका , मित्रानो, ही अजब दुनियेतील एक गजब कहाणी. आता मला सांगा, की हे सिनेनट   आणि सिनेतारका किती जणांना पुरेसे पडणार ? किती जणांच्या ते मदतीस जाणार केवळ एका प्रेमळ दृष्टी पायी ?

     या अंधश्रेद्धच पीक एवढं फोफावलंय, आणि त्याला इतकं खत-पाणी घातलं जातंय, की हा वृक्ष-रुपी भस्मासुर, साऱ्या जगाला गिळंकृत करीत चालला आहे, अगदी आताही तेच घडतंय. तर मित्रानो अशी ही अविस्मरणीय अंधश्रद्धेवरली कहाणी, की ज्यात सारी माणसे नकळत भरडली जात आहेत. ऐकुया तर थोडीशी विनोदाची झाक असलेली उपरोक्त विषयावरील कविता. कवितेचे शीर्षक आहे- " सिने-तारकांची प्रेमळ दृष्टी घालवी, मंगळाची वक्र-दृष्टी "


                      अंधश्रद्धा विनोदी कविता
       " सिने-तारकांची प्रेमळ दृष्टी घालवी, मंगळाची वक्र-दृष्टी "
      --------------------------------------------------


झाली परवा धरा-मंगळेची युती
भेटण्या आली पृथ्वीस, मंगळेची मंगल-मूर्ती
अंधश्रद्धेस घातलं जातंय इथे इतकं खत-पाणी,
अनिष्ट येणार, हीच होती ज्योतिषांची भविष्य-वाणी.

     निसर्गाची ही अजब करणी
     सौरमंडळाची आहे आश्चर्यकारक कहाणी
     आपापल्या कक्षांत फिरतात नवग्रह,
     नियमानुसार सृष्टीच्याच घडतंय सारं.

नातं जोडलंय ज्योतिषांनी अनिष्ट घटनांचं
जागोजागी घडलेल्या बॉम्ब-स्फोटांचं अन मृत्यूचं
पाप-ग्रहांची झालीय आमच्यावर वक्र-दृष्टी,
महापुरात बुडून जाईल ही सारी सृष्टी.

     अंधश्रद्धेचा एक-एक प्रकारचं अजब ऐकावा
     ज्योतिषांनी नवं -नवीन नियम घालून द्यावा
     म्हणतात, घालवायची असेल मंगळाची वक्र-दृष्टी,
     तर हवी सिनेतारकांची प्रेमळ दृष्टी.

निसर्ग-नियमात बदल घडविण्याची ताकद
कुणी दाखविते  का एका दृष्टीतून ?
जमलं तर वाचवून दाखवावं धरेस,
महा-भयंकर उत्पात घडविणाऱ्या उल्का -वृष्टीतून.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.07.2021-मंगळवार.