पाऊस कविता - "पाऊस आज मनापासून बरसतोय !"

Started by Atul Kaviraje, July 13, 2021, 12:20:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     बऱ्याच दिवसांच्या दीर्घ काळ प्रतीक्षेनंतर आज पाऊस मनापासून बरसत आहे. त्याला पाहण्यास मी इथे मुंबईत जवळ जवळ १ ते १/२ महिना वाट पहिली होती. शेवटी तो आला आहे. बरसत आहे. वर्षत आहे. साऱ्यांना भिजवत आहे. मन शांत करीत आहे. दग्ध तन, भग्न मन, थकलेले नयन, या सर्वांना तो तकवा  देत आहे.

     मित्रानो, त्याच्या येण्याने माझ्या प्रफ्फुलीत, उल्हासित मनास काय वाटतंय, हे माझे मन माझ्या पुढील कवितेतून तुम्हा सांगत आहे. कवितेचे शीर्षक आहे - "पाऊस आज मनापासून बरसतोय !"


                          पाऊस कविता
              "पाऊस आज मनापासून बरसतोय !"
             ---------------------------------


तुझ्या प्रतीक्षेत शिणले होते
नयनांतील पाणी संपले होते
आज तुला बरसताना पाहून,
पुन्हा एकदा ते वाहिले होते.

कित्येक काळ वाट पहिली
तुझ्या दर्शनास होतो आतुर
आज तुझे रूप पाहून,
मनाचे समाधान झाले होते.

काहिली होत होती तनाची
तळमळ होत होती मनाची
तुझ्या येण्याने शांत मन,
आपसूक हस्त जोडत होते.

तुला ईश स्वरूपी पाहीले
तुला देवदूती रूपे देखिले
जलदाता तू,अन्नदाता तू,
आजवर तूच पोसले होते.

तुझ्या नसण्याचे दुःख होते
उदास मन व्यथित होते
तुझे जल तनूवर झेलीत,
रोम-रोम आमोदीत झाले होते.

आज तू आला आहेस
आज मनापासून बरसला आहेस
स्तब्ध, शांत, अविचल मन,
फक्त तुलाच पहात होते.

शब्द नाहीत आज माझ्याकडे
ओठ माझे निशब्द आहेत
डोळ्यातले भाव बोलके माझ्या
तुला समजून घेत होते.

तुझे येणे अनोखे भासले
तुझे पडणे वेगळेच दिसले
तुषार तुझे, जल-बिंदू तुझे,
आपलेपणाने मज भिजवीत होते.

सोबतीस माझ्या नेहमीच होतास
सच्चा मित्र तूच होतास
आज मनापासून बरसून तू,
मैत्रीचे भान राखले होते.

अनंतकाळापासून तू असाच आहेस
अशाश्वत, चिरंतन, दैवी स्वरूपात
माझ्या  देवाला मी आज,
प्रत्यक्ष रूपात पाहीले होते.

तुझा ऋणी आहे मी
तुझ्या येण्याने सुखावलोय मी
तुझे अस्तित्त्व असेच टिकण्या,
मन प्रार्थना करीत होते.

तुला नव्हत्या कधीच मर्यादा
तुला नव्हती बंधने कुणाचीही
तुला मनापासून बरसताना पाहून,
मन मोकळे होत होते.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-१३.०७.२०२१-मंगळवार.