चारोळ्या-वात्रटिका-"दुखणे कविचे"-भाग-२

Started by Atul Kaviraje, July 14, 2021, 01:49:30 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                    चारोळ्या-वात्रटिका
                 "दुखणे कविचे"-भाग-२
                ---------------------


( 1 )
दिवाळी अंकासाठी संपादक लिहितात
आपले साहित्य त्वरित पाठवा
अन पुढे हेही लिहितात,
सोबत परतीच्या-पोस्टाचे तिकीटही पाठवा.

( 2 )
उतरत नाही शब्द कागदावर
म्हणे संपलीय पेनातली शाई
अन म्हणती पुढे निर्लज्जपणे,
लेखणी झालीय बोथट लई.

( 3 )
कवि असतो शब्दांचा व्यापारी
तेजीत असेपर्यंत चालतो बरा
धंदा झाला मंद जरी,
ठेवावी लागते त्यालाही उधारी.

( 4 )
मी कवि, बायको कवयित्री
मिळून भरपूर कविता रचल्या
अन थाटून दुकान रद्दीचे,
कागदाना चिक्कार भाव आला.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.07.2021-बुधवार.