ठोसा

Started by siddhesh 68, July 15, 2021, 02:39:28 PM

Previous topic - Next topic

siddhesh 68

काय तिच्या अदा   
मला पहा फुलं वहा  
चाणाक्षता क्षणभंगुर   
तरीही इतकी का हि निष्ठुर?     

सुंदर तरीही करारी. 
इरादा तरीही भरारी  
कधी तरी अचानक दिसते कामुक   
आठवण सुपारी आणि तूप साजूक.        

तेलकट कुरडई    
साँस बहू आणि कैकेयी   
स्वप्न हिची फिरंगी     
चौकटीत विचार आपण नारंगी   

आपण गरजू हाच शिष्टाचार
गरिबी आणि कष्टावर कोणाचा उपचार  
कमनीयता होऊ   शकते  सजा    
अश्या दुभंगलेल्या समाजाला कोण लागावेल ठोसा?


सिद्धेश सुधीर देशमुख