आशा उषेची....

Started by dinesh.belsare, March 17, 2010, 06:37:38 AM

Previous topic - Next topic

dinesh.belsare

काळोखात किर्र रात्रीच्या
जगला जो आशेने
धरुनी हात उठवले
त्यास नव्या उषेने

दुभंगली धरणी माता
जानकी मग प्रगटली
सोसुनी कष्टे हजारो
प्रेरणा जगा दावली

स्तंभ फाडूनी पहाडी
देवा जगती यावे लागले
भक्ती ज्योत ठेवण्या तेवती
प्राण, श्रावणाचे वाचले

पांडूपुत्रांनी कशाला
अज्ञातवास तो भोगला
नियतीचा तो खेळ सारा
सर्वत्र स्थापण्या धर्माला

सर्वस्वाचा त्याग करून
ज्ञान-गंगा जागी वाहली
बाल नरेंद्र नटखट तो
स्वामी म्हणून तव लाभला

स्वबळाला जागओनी
कर्मयोग जगण्या भिन्नवावे
पार करण्या अडचण्णींना
आत्म विश्वासा मनी जागवावे
                             ..... दिनेश...

santoshi.world

छान आहे! पण "नियतीचा तो खेड सारा" ......... ह्या वाक्यात खेड आहे ते नक्की खेड म्हणायचे होते की खेळ?

dinesh.belsare

चूक लक्ष्यात आणून देण्याबद्दल धन्यवाद...