रान-फुल कविता - "सौंदर्य असते रान -फुलांतही"

Started by Atul Kaviraje, July 16, 2021, 01:22:27 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

    आपण  नेहमीच  बागेत  फुललेली  मोहक  रंगी -बेरंगी  टव-टवीत   सुगंधित  फुले  पाहतो   आणि  त्या  फुलांनी   आपण  सुहासित   होतो , आपला  गेलेला  मूड  परत  येतो.   पण  मित्रानो , तुम्ही   कधीतरी   राना -वनांत   फिरायला  गेला  आहेत  का  ?  रानातल्या  पाय -वाटेने  चालता -चालता  तुम्हाला  अशीच  मोहक  रंगी -बेरंगी  वाऱ्यावर  मुक्त  डोलणारी  फुले  सहज  नजरेस  पडतील. पण  ती  पाहण्यास  तुमची  नजर  मात्र  हवी  बर.  सुगंधित , सुरभीत   ती  जरी  नसली  तरी  एक  वेगळाच  आभास   तुम्हाला  त्यातील  रंग -संगतीत  नक्कीच  आढळेल.   हे  आगळे  वेगळे  वन्य  सौंदर्य  पाहण्याची  नजर  जर  तुमच्यात  असेल  तर  तुमच्यासारखे  रसिक  तुम्हीच.  असो , ऐकुया  तर  या  रान - फुलांचे  एक  मुक्त  काव्य - वाचन.   कवितेचे  शीर्षक  आहे-  "सौंदर्य  असते  रान -फुलांतही"

                     रान-फुल कविता
              "सौंदर्य  असते  रान -फुलांतही"
              ---------------------------

सौंदर्य बागेतच नाही फुलत
वेध घ्या रानाचाही तुम्ही
तुम्हा आढळेल एक मुक्त सौंदर्य,
फक्त पाहण्याची हवी नजरही.

हे एकलेपणा, हे जीवन
हे फुल जगतेय एकाकी
पर्वा नाही जगाची तयास,
हे फुल फुलतेय इथेही.

नाही देखिली अशी रंग-संगता 
त्याहीपेक्षा सुंदर या फुलाची मोहकता
अशी नजाकत अशी टवटवी,
पाहण्यास एक प्रेमाची नजर हवी.

उपेक्षित आहे आज हे वन्य-सौंदर्य
पहा त्यास दाखवून नजरेतील औदार्य
या रान फुलांना हवा एकच प्रेमळ स्पर्श,
बिलगतील तुम्हा दाखवीत आपला हर्ष.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.07.2021-शुक्रवार.