राज-कारण वास्तव कविता - "सदिच्छा भेटीचे हे स्थान, मीडिया म्हणते, चाललय कारस्थान

Started by Atul Kaviraje, July 17, 2021, 11:17:22 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

    बऱ्याच  वेळी  राज -कारणात  असं  घडत  की , काही  कारणास्तव  दोन  पक्ष  एकत्र  येऊन  त्यांची  सदिच्छा  भेट  होते . त्यामध्ये  एकाच  किंवा  विरुद्ध  पक्ष्यांची  नेते -मंडळी  असतात . त्यापाठी  बरीच  कारणे  असतात . त्यात  राज -कारणाचा  काहीच  भाग  नसतो . फक्त  त्या  काही  इच्छा  मनात  धरूनच  केलेल्या  भेटी  गाठी  असतात . बातमीदारांची  किंवा  सोशल  किंवा  पेपर  मीडियाची , राज  कारणातील  घडणाऱ्या  प्रत्येक  घडामोडींवर  अगदी  बारीक  नजर  असते .

     आणि  जेव्हा  दोन  पक्ष  एकत्र  येऊन  त्यांची  जेव्हा  वर  नमूद  केल्याप्रमाणे  सदिच्छा  भेट  होत  असते , त्याला  हे   मीडिया  चक्क  राज -कारणाचे  लेबल  देऊन  मोकळे  होतात . विपर्यास  करून , या  दोन  पक्ष्यांत  काही  राज -कारणातील  डाव  तर  सुरु  नाहीं  ना , ते  काही  खेळी  तर  खेळत  नाहीत  ना  , अश्या  बातम्या  मग  वर्तमानपत्राच्या  मथळ्याखाली  छापून  येतात . त्यांच्यात  काही  कारस्थान  तर  सुरु  नाहीं  ना  याबाबत  हे  मीडिया  त्याचा  सुगावा  काढू  पाहात . या  सदिच्छा  भेटीचे  खूप अवडंबर  माजवले  जाते .

    खरं  तर  या  गोष्टीत  काहीच  तथ्य  नसतं , ती  फक्त  एक  सदिच्छा  भेटच  असते . श्री  भाऊ  तोरसेकर , या  ज्येष्ठ ,राजकीय   समीक्षक  आणि  विश्लेषक यांनी  यु - ट्यूब वर त्यांच्या "प्रतिपक्ष"  या चॅनेलवर, वरील  मुद्दा , विषय  मांडला  होता . तोच  संदर्भ  घेऊन  मी  ही  राज -कारणावरील , एक  गैर -समज  घडलेली  वास्तव  कविता  ऐकवीत  आहे . कवितेचे  शीर्षक  आहे -"सदिच्छा भेटीचे हे स्थान, मीडिया म्हणते, चाललय कारस्थान ?"


                       राज-कारण वास्तव कविता

    "सदिच्छा भेटीचे हे स्थान, मीडिया म्हणते, चाललय कारस्थान ?"
   -------------------------------------------------------

     
काय चाललंय आज राज-कारणात ?
खरेपणाचा गंधही नसतो त्यात  !
सत्य हे नेहमीच असते कडू,
खोट्यालाच मिळतो भरपूर वाव यात.

मीडिया, वृत्तपत्रे, बातम्यांचा असतात आरसा
पण हे चित्रही कधी कधी फसवे निघते
धूसर होऊन जाते, आरश्यातील प्रतिमा,
काच आरश्याची काळीच राहाते.

बातमी होते नेते - भेटींची वारंवार
खबर मिळते मीडियाला बार-बार
कयास बांधला जातो, चुकीचा,
गंधही नसतो यात, खऱ्याचा.

दोन पक्ष विरोधी भेटता, छापते मीडिया
काही-तरी काळे - बेरे आहे यात !
बंद दारा-आडील चर्चेस, लिहिते,
काही-तरी पाणी मुरतंय आत !

खरी गोष्ट तर वेगळीच असते
ही तर फक्त सदिच्छा भेटच असते
त्याचे अवडंबर माजवले जाते,
त्याची खोटी बातमी केली जाते.

नेहमीच का होतात राज-कारणावर चर्चा ?
इतर विषयांवर बोलण्यास मनाई का आहे ?
विरोधी पक्षांतील दोन जिवलग मित्रांनी,
एकत्र येऊन कधी भेटूही नये ?

कुणीतरी कुणाची करतंय चौकशी
मीडियाला हेही नाही पहावत
डोळे त्यांचे त्यांनाच फसवून जातात,
या कानाचे त्या कानाने सोडून देतात.

बऱ्याचश्या अटकळी बांधल्या जातात
मीडियाला खमंग बातम्या मिळतात
सदिच्छा भेटीचे रूपांतर, होते राज-कारणात,
हे सारे ते रंगवून-सजवून छापतात.

वर्तमानपत्रे मग हातोहात खपतात
साऱ्या बातम्या व्हायरल होतात
खोट्या बातम्यांचे पीक येऊन,
खऱ्या बातम्या लोप पावतात.

अश्या गोष्टींचा नेहमीच पाठलाग करते मीडिया
अश्या भेटींचा नेहमीच गवगवा करते मीडिया
गाडी उगीच नेऊन कुठेतरी भरकटवत राज-कारणाची,
अक्षरशः गेलीय ही अंध मीडिया चक्क वाया.

अरे, तुम्ही ठेवा नेहमी खऱ्याचे भान
खोट्या बातम्या करून तुम्हा काय मिळेल ?
प्रथम सत्याची करून घ्या खातरजमा,
अंधारात चालवू नका फुके तिर-कमा !

सदिच्छा भेट घेऊ-द्या नेत्यांना
तुमचे बातमीदार जरा दूर ठेवा
एकाचे दोन करून छापू नका,   
राज-कारणास यात उगीच ओढू नका.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.07.2021-शनिवार.