अंतर-जातीय विवाह-कविता - "जात-पात बंधने दूर सारूया, अंतर जातीय विवाहाचा स्वीकार

Started by Atul Kaviraje, July 18, 2021, 11:05:47 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

      यु-ट्यूब वर दोन दिवसांपूर्वीच एक बातमी पुढीलप्रमाणे व्हायरल झाली होती. एक विवाह सोहळा इथे आयोजिण्यात आला होता. पण तो कुणामध्ये हे आपण पुढे वाचूया. कोल्हापूर मध्ये हिंदू, मुस्लीम लग्न सोहळ्याचं एवढं कौतुक का झालं?,कोल्हापूरच्या प्रगत विचारांचा वारसा कायम ठेवत हिंदू कुटुंबातील सत्यजीत यादव आणि मुस्लीम कुटुंबातील मार्शा मुजावर हे दोघं नुकतेच विवाहबद्ध झाले. दोन्ही धर्मातील पारंपरिक लग्न पद्धतीने त्यांचा विवाह पार पडला, त्यामुळे हा लग्नसोहळा कोल्हापूरमध्ये चर्चेचा विषय झाला होता. दोन्ही कुटुंबातीलच नाही तर कोल्हापूरकरांनी सत्यजीत आणि मार्शाला भरभरून  आशिर्वाद दिले.

          मित्रानो, ना भूतो न भविष्यती, अशी ही बातमी वाचून,मला त्या वधू वरांचा अभिमान वाटला, अंतर जातीय विवाहास आतापर्यंत जो काही पुरोगामी जनांकडून विरोध होत होता, तो या दोघांनी सपशेल हाणून पाडून, एक पाऊल पुढे टाकून, प्रगत विचारांचा पायंडा रुजवून, समाजाला दाखवून दिले की, जात पात हे काहीही नसतं, अवडंबर न माजवता, खूप काही गोष्टी करता येतात. आणि या दोघांनी निकाह आणि मंगलाष्टकाच्या गजरात, पारंपरिक पद्धतीने लग्न करून एक आदर्श समाजापुढे ठेवला. त्यांचे करावे तितके कौतुक थोडेच आहे.

          मित्रानो, त्यांनी हा समाजापुढे नवीन पायंडा पाडून दिला आहे, त्याचे पुरस्कर्ते होऊन, यापुढेही होणाऱ्या अशा अंतर-जातीय विवाहांना, पाठिंबा  देऊन भावी वधू वरांचे आयुष्य सुखी करण्याचा प्रयत्न करूया, व समाजास, आतापर्यंत चालत आलेल्या या अनिष्ट रूढींमधून बाहेर काढून एक अभिनव कर्म करूया. असो, या विषयावरील एक कविता प्रस्तुत करत आहे. कवितेचे शीर्षक आहे-"जात-पात बंधने दूर सारूया, अंतर जातीय विवाहाचा स्वीकार करूया"


           
                  अंतर -जातीय विवाह - सामाजिक-वास्तव कविता
   "जात-पात बंधने दूर सारूया, अंतर जातीय विवाहाचा स्वीकार करूया"
  -------------------------------------------------------------- 



स्वर्गात बांधल्या जातात पवित्र लग्न-गाठी
वधू-वर उभे राहतात अंतर-पाटा पाठी
मंत्रोच्चार स्वरात अन देवा-ब्राम्हणांच्या साक्षीने,
लग्नाच्या मारल्या जातात प्रत्यक्ष गाठी.

दोन घरे जोडली जातात एकमेकांशी
अतूट नाते जाते जोडले घराचे घराशी
त्यांची सुख दुःखे मग एक होतात,
सासू सासरे एकमेकांचे आई -वडील होतात.

पूर्ण जीवन बदलून जाते वधू-वरांचे
फळ मिळते त्यांना एकमेकांवरील प्रेमाचे
जीवनाचा जोडीदार, सोबती ठरतो कायमचा,
संसार उमलतो त्यांचा सुखाचा अन आनंदाचा.

जाती-बाह्य विवाहाचे वावडे  होते तेव्हा
जाती-बाहेरच समाज टाकत होता तेव्हा
अंतर-जातीय विवाहाला मिळत नव्हता होकार,
अश्या वधू-वरांचा होत नव्हता स्वीकार .

आज  या  कायद्याची  होळी पेटत आहे
तिची  कलमे  अग्नीत  जळत  आहेत
सर्व  नियमांना  धाब्यावर  बसवून ,
वर  आणि  वधू  पाटांवर  उभी  आहेत .

हिंदू -मुस्लिम  ऐक्य  दिसून  येत  होते
हिंदू -मुस्लिम  प्रेम  जुळून  आले  होते
निकाह  आणि  मंगलाष्टकांची आज अनोखी ,
युती  जुळून  आली   होती .

सत्यजित  मार्शाच्या   प्रगत  विचारांचा
विवाहावर  पगडा  दिसत  होता
जाती -पतींची  झुगारून  सारी  बंधने ,
विवाह  सोहळा  उत्तम  पार  पडला  होता .

मार्शा  सत्यजिताने  उदाहरण  दिले  होते
लग्ना -आड  जात  पात  येत  नाही
असतो  फक्त  शुद्ध  अंतःकरणाचा  भाव ,
आणि  माणुसकी  जपणारा  माणसाचा  स्वभाव .

पारंपरिक  पद्धतीने  होत  विवाह
दोघे  एकमेकांजवळ  आले  होते
काहीतरी  नवीन  केल्याचे  समाधान ,
त्यांच्या  चेहऱ्यावर  विलसत  होते .

दोन  मने  जुळता  इथे
धर्माचे  अवडंबर  का  आड  यावे  ?
रक्ताचा  रंग  तर  एकच  आहे  ना,
मग  जाती  पातींचे  का  बंधन  असावे  ?

पुरोगामी  विचार-सरणींचा  करून  त्याग
नवं -विचारांचा  व्हावा  सर्वतोपरी अवलंब
अंगीकार  करून  या  अभिनव  संकल्पनेचा, 
कर्म करण्या कधीही न व्हावा यापुढे  विलंब .

सत्यजित  मार्शाचे  अभिनंदन  करूया
प्रगत  विचारांचा  त्यांनी  घालून  दिलाय  पायंडा
वर -वधूस  एक -सूत्रात , एक-बंधनात  बांधणाऱ्या  या ,
अंतर -जातीय  विवाहास आपणच  देऊया  पाठिंबा .


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.07.2021-रविवार.