II श्री विठ्ठल II-कोरोना - वास्तव चारोळया - "दिंडी निघाली एस. टी. ने पंढरपूरला

Started by Atul Kaviraje, July 19, 2021, 06:05:14 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     या महिन्याच्या  येत्या २०.७.२०२१-मंगळवार रोजी, पंढरपूरला विठ्ठलाचा  "देवशयनी आषाढी एकादशी" चा महोत्सव साजरा होणार आहे. अशी परंपरा आहे कि, वारकरी पंथ या वारीसाठी, प्रत्येक संतांची पालखी आळंदी , देहू आणि अश्याच बऱ्याच देव क्षेत्रांतून खांद्यावर वाहून तिची दिंडी  एका ठराविक ठिकाणी एकत्र  येते, व ते सारे भक्त, वारकरी, विठूचा गजर करीत, माऊलीच्या भक्तीत तल्लीन होतं, टप्प्याटप्याने पायी प्रवास करीत, शेवटी इप्सित स्थळी, म्हणजे पंढरपुरी पोचून, विठ्ठलाच्या पवित्र चरणी आपला माथा टेकवून, त्याच्याशी एकरूप होतात. इथे त्यांच्या वारीची, पर्यायाने दिंडीची सांगता होतं असते.

          पण, आता कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे, सरकारने या पद-यात्रेस किंवा दिंडीस, किंवा वारीस बंदी आणली आहे. सामाजिक अंतर  राखण्याचा कायदा संमत झाल्यामुळे, ही पालखी आता पायी न जाता एस.टी.पंढरपुरी नेण्याचा नियम लागू होतं आहे. सारे वारकरी यामुळे निराश, तर काही ठिकाणी संतापाची लाट उसळत आहे. परंतु सरकारलाही त्यांच्या सुरक्षिततेसाठी हे कडक नियम लागू करणे भाग आहे.  त्यामुळे आतापर्यंत न घडलेले असे नवल आज पहाण्यास मिळत आहे. पालखी रस्त्याने न जाता , चक्क बसने पंढरीस चालली आहे. काही वास्तविक, खुमासदार, गंभीर, विनोदाची झाक असलेल्या चारोळ्या मी त्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करीत आहे. II  विठ्ठल, विठ्ठल II




                                II श्री विठ्ठल II
                           कोरोना - वास्तव चारोळया 

                    "दिंडी  निघाली एस. टी. ने पंढरपूरला "
                  ------------------------------------
                                   (भाग-2)


(६)
नाच नाही, फुगडी नाही, गाणे नाही
सारं सारं  कसं सुन वाटूनच राही
गजर नाही, टाळ नाही, मृदूंग नाही,
आषाढीची आज मजा राहिली नाही.

(७)
रस्त्यांना ओढ आहे आज पावलांची
शुभ्र कपडे परिधान केलेल्या गावकऱ्यांची
त्या विठ्ठलाच्या अनाहत गजर नादाची,
त्या खांद्यावरून वाहिलेल्या सजलेल्या पालखीची.

(८)
लाल परी आज फॉर्मात आहे
तातडीने पंढरपूरची  फेरी वाढत आहे
दिंडीची पद-यात्रा बंद झाल्यापासून,
तिच्या चलनात बरीच वाढ झाली आहे.

(९)
स्त्रियांचा उत्साह आज दुपटीने मावळला आहे
डोईवरल्या तुळशी वृंदावनाचा भार उतरला आहे
नाच, फुगडी, इतर खेळांवर बंदी आल्यामुळे,
रखुमाईच्या ही चेहऱ्यावर प्रशचिन्ह आले आहे.

(१०)
मोजक्याच भक्तांना देवळात प्रवेश आहे
विठ्ठलाचा गाभारा आज सुना सुना आहे
होत होती भक्तांची दर्शना - विठ्ठला गर्दी,
विठ्ठल स्वतः भक्ताच्या दर्शनाची वाट पाहात आहे.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.07.2021-सोमवार.