II श्री विठ्ठल II- कोरोना - वास्तव चारोळया - "दिंडी निघाली एस. टी. ने पंढरपूरल

Started by Atul Kaviraje, July 20, 2021, 11:11:13 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     या महिन्याच्या  येत्या २०.७.२०२१-मंगळवार रोजी, पंढरपूरला विठ्ठलाचा  "देवशयनी आषाढी एकादशी" चा महोत्सव साजरा होणार आहे. अशी परंपरा आहे कि, वारकरी पंथ या वारीसाठी, प्रत्येक संतांची पालखी आळंदी , देहू आणि अश्याच बऱ्याच देव क्षेत्रांतून खांद्यावर वाहून तिची दिंडी  एका ठराविक ठिकाणी एकत्र  येते, व ते सारे भक्त, वारकरी, विठूचा गजर करीत, माऊलीच्या भक्तीत तल्लीन होतं, टप्प्याटप्याने पायी प्रवास करीत, शेवटी इप्सित स्थळी, म्हणजे पंढरपुरी पोचून, विठ्ठलाच्या पवित्र चरणी आपला माथा टेकवून, त्याच्याशी एकरूप होतात. इथे त्यांच्या वारीची, पर्यायाने दिंडीची सांगता होतं असते.

          पण, आता कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे, सरकारने या पद-यात्रेस किंवा दिंडीस, किंवा वारीस बंदी आणली आहे. सामाजिक अंतर  राखण्याचा कायदा संमत झाल्यामुळे, ही पालखी आता पायी न जाता एस.टी.पंढरपुरी नेण्याचा नियम लागू होतं आहे. सारे वारकरी यामुळे निराश, तर काही ठिकाणी संतापाची लाट उसळत आहे. परंतु सरकारलाही त्यांच्या सुरक्षिततेसाठी हे कडक नियम लागू करणे भाग आहे.  त्यामुळे आतापर्यंत न घडलेले असे नवल आज पहाण्यास मिळत आहे. पालखी रस्त्याने न जाता , चक्क बसने पंढरीस चालली आहे. काही वास्तविक, खुमासदार, गंभीर, विनोदाची झाक असलेल्या चारोळ्या मी त्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करीत आहे. II  विठ्ठल, विठ्ठल II




                            II श्री विठ्ठल II
                      कोरोना - वास्तव चारोळया 

                "दिंडी  निघाली एस. टी. ने पंढरपूरला "
              ------------------------------------
                                (भाग-3)



(११)
सोशल डिस्टंसिंग च्या नियमांचे पालन होतं आहे
वारकरी अंतर राखून चालत आहेत
लाखो वारकऱ्यांच्या पद-यात्रेची रांग, उपग्रहातून,
" द ग्रेट वोल ऑफ चायना" च्याही तोडीची दिसत आहे.

(१२)
कोरोनाही अजूनही आपल्याला साथ  देतोय
सामाजिक अंतर राखण्याचे भान देतोय
सर्व समाज एकत्र झाल्याचे पाहून,
प्रत्यक्ष विठ्ठलही विस्मयाने पाहत रहातोय.

(१३)
चंद्रभागेला आज आलंय आनंदाचे भरते
नेहमीप्रमाणे वाहतेय ती दुथडी भरून
भक्तांच्या स्नानाची ती वाट पहातेय ,
अगदी सकाळपासून, भल्या पहाटेपासून.

(१४)
पावसाला ही आश्चर्य वाटतंय राहून-राहून
आज मी फक्त रस्ताच भिजवत चाललोय
कुठे गेली ती वारकरी भक्तांची रांग ?
ज्यांच्या दाटीमुळे लपत होता आजवर रस्ता अथांग.

(१५)
एस. टी. महा-मंडळ आजही खुशीत आहे
उलटलीत बरीच वर्षे त्या गोष्टीला
आता झालेय नित्याचेच, दर सहा महिन्यांनी,
वारकऱ्यांना घेऊन जायचे  पंढरीला.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.07.2021-मंगळवार.