पाणी-भेसळ विनोदी वास्तव कविता - "बिसलेरी बाटली,मुंग्या-जंतूंची खोली !"

Started by Atul Kaviraje, July 21, 2021, 01:27:10 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

  आणि  एक,  भेसळ  या  विषयावरली  कवितेची  संकल्पना . रेडी -मेड  जल  पिणाऱ्यास  मिळावे , म्हणून बऱ्याच  कंपन्यांनी  आपल्या  शुद्ध , मिनरल  पाण्याची  कंपनी  उघडून  पाणी  पिण्याची  उत्तम  आणि  जलद  सोय  केली  आहे . प्रवासात  असताना  आपण  घरून  पाणी  नेत  नाही , किंवा  काही  कारणास्तव  ते  राहून  जाते , अश्या  वेळी  हे  मिनरल पाणीच  आपली   तहान  भागवीत  असते . बऱ्याच  नामांकित  कंपन्यांपैकी  बिसलेरीचे  नावं  सर्व -श्रुत  आहे . अगदी  देशभर  त्याचा  स्टॉक  सर्व  क्षेत्रातील  लोकांना  आणि  उदोग -धंद्यांना  पुरवला  जातो . त्याची  निर्मळ  चव , शुद्धता  यावर  वादच  नाही .

   पण  काही  दिवसांपूर्वीच  एक  बातमी  आली  होती , कि  बिसलेरीच्या  काही  बाटलीतील  पाण्यात,  पिणाऱ्यांना  चक्क  मेलेल्या  मुंग्या  आणि  तत्सम  कीटक  आढळून   आले  होते . पण  हे  कसे  घडले  ? यात  चूक  कोणाची  होती ? बिसलेरी  कंपनीची  कि  आणि  कुणाची  ? मित्रांनो , बहुतेक  भेसळ  करणाऱ्या  समाज -विघातक  लोकांचेच  हे  काम  आहे , की  जे  लोकांच्या  जीवावरच  उठले  आहेत . बिसलेरी  कंपनीला यात   दोष  देऊन  फायदा  नाही .

   तर  अश्या  अनेक  भेसळ  करणाऱ्या  कंपन्या  ठिकठिकाणी  आपला  पाण्याचा  खोटा  आणि  छोटा  धंदा  उभारून  अवैधपणे  बाटल्यांत  पाणी  भरून  चक्क  त्यावर  बिसलेरीचे  लेबल  लावून  खप  करताहेत . त्यांना  यातून  बिसलेरीच्या  नावाखाली  भरमसाट  पैसा  मिळतोय  हे  नक्कीच  . पण  त्यांना  हे  कळत  नाही  की  सामान्य  नागरिकांच्या  जीवाला  हे  भेसळ -युक्त  पाणी  धोक्याचं  आहे . मित्रांनो , अश्या समाज -कंटकांना  त्वरित  कारवाई  करून  अटक  व्हावी , जेणेकरून  त्यांचे  हे  भेसळीचे  कार्यक्रम  पूर्णतः  थांबतील , व  पर्यायाने  बिसलेरी  कंपनीचे  नाव  अबाधित  राहील . ऐकुया  तर  उपरोक्त  विषयावर  पाणी -भेसळ -युक्त  विनोदी , व्यंग्य  कविता  . कवितेचे  शीर्षक  आहे -"बिसलेरी बाटली,मुंग्या-जंतूंची खोली !"


                      पाणी-भेसळ विनोदी वास्तव कविता

                    "बिसलेरी बाटली,मुंग्या-जंतूंची खोली !"
                   -----------------------------------


पाणी कसले, उकळूनही नासले
साऱ्या जनतेला हे कळूनही भागले
मग तयार बाटलीतले पाणी प्या,
सदैव बिसलेरीचेच नाव घ्या !

     शुद्ध (?) प्रक्रियेचे पाणी पिऊन
     तब्येत आपली उत्साही बनवा
     कंपनीने केलीय जोरदार जाहिरात,
     पारदर्शकता आणलीय बाटलीत अन पाण्यात.

पाहावे तिथे बाटल्याचं प्लॅस्टिकच्या
दुकानात काय, त्या झाल्यातही घरच्या
पाण्याच्या नावाखाली खूप कमावले,
पाणी-विकून बिसलरीने धर्मार्थ कार्य केले ?

     पण काहीतरी बिनसले बिसलेरीचे
     आढळले मृतदेह पाण्यात मुंग्या-कीटकांचे
     वृथा आत्मविश्वास आडवा आलाय,
     उभ्या बाटलीला गढूळ करून गेलाय.

विश्वास उडालाय आता यांच्यावरचा
पाण्याशी (जीवनाशीच) चाललाय खेळ यांचा
अमृतासम पाण्याचे विष केलंय यांनी,
शिक्षेस यावे यांच्या, भयंकर काळे-पाणी.

दोष  देऊन  नाही  फायदा  बिसलेरीस
शुद्ध  पाण्याची  सिद्ध  झालीय  प्रमाणता   
पाणी  भेसळीचा अवैध धंदा जोरात आहे सुरु,
लोकांच्या जीवाशी खेळण्याचा वाम -पंथ लागलेत धरू .

नकली  बाटल्यांवर  बिसलेरीचे  लेबल  लावून
त्यांनी  केला  धंदा ,अमाप  छापला  पैसा
या  समाज -कंटकांना  व्हावे  कडक  शासन,
मिळेल आम्हा बिसलेरीचे खरेखुरे पाणी करण्या प्राशन .


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.07.2021-बुधवार.